scorecardresearch

शिंदेंनी दर्शन न घेतल्याने देवीचं विसर्जन थांबवलं: मनसेचा मंडळाला इशारा; “देवापेक्षा CM मोठे झाले का? विसर्जन करा अन्यथा…”

या मंडळाच्या अध्यक्षांनी आपली भूमिका मांडताना मुख्यमंत्र्यांना दर्शनासाठी आमंत्रण दिल्याचं म्हटलं आहे.

शिंदेंनी दर्शन न घेतल्याने देवीचं विसर्जन थांबवलं: मनसेचा मंडळाला इशारा; “देवापेक्षा CM मोठे झाले का? विसर्जन करा अन्यथा…”
मनसेनं दिला मंडळाला इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्या देवीच्या दर्शनाला येत नाहीत तोपर्यंत आम्ही देवीचं विसर्जन करणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या नवरात्रोत्सव मंडळाला आता राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं इशारा दिला आहे. कळवा-विटाव्यामधील सूर्यनगर भागात असणाऱ्या नवदुर्गा चॅरिटेबल ट्रस्ट नावाच्या मंडळाने सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त स्थापना केलेल्या देवीच्या मूर्तीचं दसऱ्यानंतरही विसर्जन केलेलं नाही. मुख्यमंत्री शिंदे जोपर्यंत आमच्या या मंडळाला भेट देत नाही तोपर्यंत दुर्गा विसर्जन करणार नाही सांगणाऱ्या या मंडळाला थेट मनसेनं इशारा दिला आहे.

नक्की वाचा >> “आई-वडिलांना शिव्या द्या चालेल पण मोदी, शाहांना शिव्या देणं सहन करु शकत नाही”; जाहीर भाषणात चंद्रकांत पाटलांचं विधान

मंडळाचं म्हणणं काय?
या मंडळाच्या अध्यक्षांनी आपली भूमिका मांडताना मुख्यमंत्र्यांना दर्शनासाठी आमंत्रण दिल्याचं म्हटलं आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना आमच्या मंडळाच्या या उत्सवस्थळाला भेट देण्यासाठी आणि देवीच्या दर्शनास येण्याची विनंती केलेली आहे, परंतु कदाचित ते विसरले असावेत. आम्ही त्यांना आता पुन्हा एकदा दर्शनास येण्याची विनंती करत आहोत. ते दर्शनाला येत नाहीत तोपर्यंत आम्ही देवीच्या मूर्तीचं विसर्जन करणार नाही, असं मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितलं.

नक्की वाचा >> Dasara Melava : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “विचार ही नाही आणि…”

नक्की वाचा >> Dasara Melava: ‘फिरायला नेतो’ सांगून परराज्यातील कामगारांना पुण्यातून CM शिंदेंच्या मेळाव्याला आणलं; म्हणे, “राज ठाकरेंच्या…”

मनसेची वादात उडी
या मंडळाने देवीच्या मूर्तीचं विसर्जन केलं नाही अशी माहिती समोर आल्यानंतर आता मनसेनं या वादात उडी घेत थेट मंडळाला इशारा दिला आहे. मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी या मंडळाला खडे बोल सुनावताना मुख्यमंत्री हे देवापेक्षा मोठे नाहीत असं म्हटलं आहे. तसेच हा हिंदू धर्माचा आणि हिंदूंच्या भावनांचा अपमान असल्याचंही जाधव यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.

नक्की पाहा >> Photos: भाषणादरम्यान चिठ्ठी आली अन्… नातवाबद्दल उद्धव ठाकरेंचं ‘ते’ विधान पाहून CM शिंदे संतापून म्हणाले, “तुमचा मुलगा…”

“देवापेक्षा मुख्यमंत्री मोठे झाले का?”
“नऊ दिवस झाल्यानंतर आपण देवीचं विसर्जन करतो. ठाण्यातील विटाव्यामधील एका मंडळाने असं म्हटलं आहे की जोपर्यंत मुख्यमंत्री येणार नाही तोपर्यंत आम्ही देवीचं विसर्जन करणार नाही. मला वाटतं हा हिंदू धर्माचा अपमान आहे. देवापेक्षा मुख्यमंत्री मोठे झाले का? मुख्यमंत्री हिंदू, हिंदूत्व म्हणतात ते खोटं आहे का? आमचं म्हणणं आहे की देवीचं विसर्जन नियमाने करा. त्याचा खेळ करु नका,” असं जाधव म्हणाले आहेत.

नक्की वाचा >> Dasara Melava: “…तेव्हा राज ठाकरेंना शिव्या घालण्याचे आदेश ‘मातोश्री’वरुन आले”; शिंदे गटातील खासदाराचा खळबळजनक आरोप

“देवाचा उपयोग राजकारणासाठी करु नका”
या मंडळाला इशारा देताना जाधव यांनी, “देवाचा उपयोग भक्तीसाठी करा तुमच्या राजकारणासाठी करु नका. देव हे आमच्या श्रद्धेसाठी आहेत. देवीचं विसर्जन वेळेत केलं नाही तर मनसे स्वत: त्या देवीचं विसर्जन करेल. एक लक्षात ठेवा हिंदू धर्माचा अपमान करु नका. मुख्यमंत्री देवापेक्षा मोठे नाहीत,” अशी आठवण या मंडळाला करुन दिली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या