लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : ठाणे शहरात रविवारी राम मारूती रोड, गडकरी रंगायतन चौक परिसरात राजकीय पक्षांकडून दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी ठाणे पोलिसांनी महत्त्वाचे वाहतुक बदल लागू केले आहेत. रविवारी सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत वाहतुक बदल कायम असणार आहे. त्यामुळे पर्यायी मार्गावर वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे.

तलावपाली येथील गडकरी रंगायतन चौक, राम मारूती रोड, चिंतामणी चौकात शिंदे गट, ठाकरे गट, भाजपतर्फे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या दिवाळी पहाट कार्यक्रमास ठाणे, कल्याण, डोंबिवली भागातून अनेक महाविद्यालयीन तरूण-तरूणी एकत्र जमत असतात. त्यामुळे मोठी गर्दी या भागात होते. या कालावधीत वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे वाहतुक पोलिसांनी बदल लागू केले आहेत.

आणखी वाचा-ऐन दिवाळीत ठाण्यात रिक्षा कोंडी, स्थानक परिसरात प्रवाशांच्या रिक्षांसाठी लांब रांगा

असे आहेत वाहतुक बदल

  • डॉ. मूस चौक येथून गडकरी रंगायतन चौकाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना डॉ. मूस चौकात प्रवेशबंदी असेल. येथील वाहने डॉ. मूस चौक येथून टॉवर नाका, टेंभीनाका मार्गे वाहतुक करतील.
  • गडकरी चौकातून डॉ. मूस चौक या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना गडकरी चौकात प्रवेशबंदी असेल. येथील वाहने अल्मेडा चौक, वंदना सिनेमा, गजानन चौक, तीन पेट्रोल पंप, हरिनिवास चौक मार्गे वाहतुक करतील.
  • घंटाळी चौक येथून पु.ना. गाडगीळ चौकाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना घंटाळी चौक येथे प्रवेश बंदी असेल. येथील वाहने घंटाळी देवी पथ मार्गे वाहतुक करतील.
  • गजानन महाराज चौक ते तीन पेट्रोल पंपच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना गाडगीळ चौकाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना काका सोहनी पथ येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने तीन पेट्रोल पंप, हरिनिवास चौक किंवा घंटाळी मार्गे वाहतुक करतील.
  • राजमाता वडापाव दुकान येथून गजानन महाराज चौकाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना राजमाता वडापाव दुकानाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने गोखले रोड मार्गे वाहतुक करतील.
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic changes in thane on the occasion of diwali pahat mrj
First published on: 11-11-2023 at 14:42 IST