ठाणे : ठाणे येथे पाच अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. शंकर केसरसिंह सोनी (३२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी तक्रारदार अल्पवयीन पिडीत मुलगी आणि इतर चार पिडीत अल्पवयीन मुली ठाण्यातील एका भागातून जात असताना, त्याठिकाणी शंकर हा पायी चालत येऊन तक्रारदार अल्पवयीन मुलगी आणि इतर चार अल्पवयीन मुलींचा विनयभंग केला. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यातील संवेदनशीलता पाहता आरोपीचा शोध घेण्यासाठी परिमंडळ ५ चे पोलीस उप आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वर्तकनगर पोलिस ठाणे, कापुरबावडी पोलिस ठाणे, वागळे इस्टेट पोलिस ठाणे, चितळसर पोलिस ठाणे आणि श्रीनगर पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पाच तपास पथके तयार करण्यात आले होते. त्यांना आरोपीचा शोध घेण्याबाबत सुचना आणि मार्गदर्शन करण्यात आले आणि तात्काळ तपास सुरू करण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या गुन्ह्याचा तांत्रिक तपास आणि गोपनीय माहीतीच्या आधारे तपास करून आरोपीचा शोध घेण्यात आला. आरोपी शंकर केसरसिंह सोनी(३२) याची चौकशी केली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. सर्व बाबींची पडताळणी करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. सदर अटक आरोपीचा अभिलेख तपासला असता त्याच्यावर यापुर्वी देखील कळवा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली.