केंद्राच्या जलजीवन मिशन उपक्रमातून प्रतिदिन, माणशी ५५ लिटर पाणीपुरवठा

कल्पेश भोईर ,  लोकसत्ता

Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
New standards for facilities safety in nurseries
पाळणाघरांतील सुविधा, सुरक्षिततेबाबत नवीन मानके
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना

वसई: प्रत्येक कुटुंबाला नळ जोडणी मिळावी  यासाठी केंद्र सरकारने जलजीवन मिशन उपक्रम सुरू केला आहे. याच उपक्रमातून वसईच्या ग्रामीण भागातील कुटुंबांना पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याने  लवकरच या कुटुंबांना पाणी पुरवठा उपलब्ध करून दिला जाणार आहे. प्रतिदिन, माणशी ५५ लिटर पाणीपुरवठा घरोघरी  करण्यासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू आहे.

वसईतील  ग्रामीण भागात ३१ ग्रामपंचायती असून यात १९० वस्त्यांचा समावेश आहे. या हद्दीतील सर्वच कुटुंबांना, अंगणवाडी, आरोग्यकेंद्र, शाळा इत्यादी ठिकाणी  जल जीवन मिशन या योजनेतून पाणी पुरवठा करण्यासाठी  हालचाली सुरू झाल्या आहेत. यात शासनाच्या जल जीवन मिशन या योजनेत प्रत्येक नागरिकांला दिवसाला साधारणपणे ५५ लिटर पाणी देणे बंधनकारक आहे. त्यानुसार प्रत्येक विभाग व गाव निहाय सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. यामध्ये सुरवातीला ५५ लिटरप्रमाणे पाणी देण्यासाठी कोणते स्रोत उपलब्ध आहेत, नवीन स्रेत कोणते विकसित करता येतील, किंवा आधीच्या ज्या योजना आहेत त्यांनाच ५५ लिटर प्रतिमाणसी पुरवठा करण्यासाठी आवश्यक बाबी पूर्ण केल्या जाणार आहेत. तर ज्या ठिकाणी काहीच पाण्याची सुविधा नाही त्याठिकाणी नवीन योजना तयार केली जाणार असल्याची माहिती वसई पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

सध्या स्थितीत तालुक्यात २४ हजार ३८० कुटुंब आहेत.यापैकी ९ हजार २४७ कुटुंबाकडे आधीपासून नळजोडण्या आहेत. तर आता उर्वरित १५ हजार १३३ कुटुंबांना या योजनेतून घरोघरी नळ देण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर जाऊन त्यांचे सर्वेक्षण करून अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाचे अभियंता पी. एस. कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

भूजल सर्वेक्षण करणार

जलजीवन मिशन योजना प्रभावी पणे राबविण्याचे काम तालुकास्तरावर सुरू झाले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना योग्य रित्या पाणी पुरवठा व्हावा यासाठी स्रेत निष्टिद्धr(१५५)त करावे लागणार आहेत. तर ज्या ठिकाणी स्रेत उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी भूजल सर्वेक्षण करून पाण्यासाठीचे स्रेत शोधावे लागणार आहेत.

शासनाने सुरू केलेली जलजीवन मिशन योजना राबविण्याचे काम ग्रामपंचायत हद्दीत सुरू करण्यात आले आहे.त्यासाठी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता व त्यांचे पथक ग्रामपंचायतींशी संपर्क साधून पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

—बी.एन. जगताप, गटविकास अधिकारी पंचायत समिती वसई.