ठाणे : मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीमध्ये गुरुवारी दुपारी एका महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची नोंद मुंब्रा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी हा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविला आहे. मृताची ओळख अद्याप पटली नसल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली.

मुंब्रा येथे बालाजी काकडे गणेश विसर्जन घाट जवळ असलेल्या रेतीबंदर खाडी किनारी गुरुवारी दुपारी ४:५४ वाजता एका महिलेचा (अंदाजे वय २५ ते ३०) मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी मुंब्रा पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. यावेळी पोलिस कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने खाडीतील मृतदेह बाहेर काढण्यात आला.

मुंब्रा पोलीस कर्मचारी यांच्या ताब्यात हा मृतदेह देण्यात आला आहे. या व्यक्तीचा मृतदेह मुंब्रा पोलीस कर्मचारी यांनी पुढील कार्यवाहीसाठी शवावाहिकेतून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविला आहे. या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे मुंब्रा पोलिसांनी सांगितले.