‘आसमंत’ संस्थेतर्फे येत्या ४ ते ७ मे दरम्यान मध्य प्रदेशमधील बांधवगड राष्ट्रीय उद्यान सफारीचे आयोजन करण्यात आले आहे. बांधवगड हे ऐतिहासिक काळापासून राजघराण्याचे राखलेले जंगल आहे. सध्या व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर झालेल्या या ४४८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या जंगलात वाघांशिवाय बिबटे, जंगली कुत्री, नीलगाय, चौशिंगा, भेकर, चिंकारा, रानडुक्कर, सांबर, चितळ, हनुमान लंगूर अशा अनेक प्राण्यांचे वास्तव्य आहे. अडीचशेहून अधिक जातींच्या पक्ष्यांचीही इथे नोंद झाली आहे. अशा या जंगलात हत्ती आणि जीपमधून हे प्राणी दाखवण्याची सोय आहे. अधिक माहितीसाठी संतोष भिडे (९९३०६६०७३१) यांच्याशी संपर्क साधावा.

महिलांसाठी ताडोबा जंगल सफारी
‘निसर्ग सोबती’तर्फे येत्या ८ ते १० मार्च दरम्यान खास महिलांसाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीचे आयोजन केले आहे. ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने खास महिलांसाठी या जंगल भ्रमंतीचे आयोजन केले आहे. या सफारीचे सर्व आयोजन हे महिलांकरवी केले जाणार आहे. ताडोबा हा देशातील एक महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे. ६२३ चौरस किलोमीटर क्षेत्र असलेल्या या जंगलाचा राजा वाघ आहे. इथे वाघांशिवाय बिबटय़ा, गवे, सांबर, चितळ, वानर, भेकर, मगरींसह अन्य प्राणीही दिसतात. अनेक पशुपक्ष्यांचा मुक्त वावर आहे. नवरंग, स्वर्गीय नर्तकसारखे दुर्मिळ पक्षी या जंगलात दिसतात. ४५ प्रकारचे सस्तन प्राणी, २८० प्रकारचे पक्षी, ९४ प्रकारची फुलपाखरे, २६ प्रकारचे कोळी आणि ३० सरपटणारे प्राणी अशी ही या जंगलाची संपत्ती आहे. अशा या खास महिलांसाठी ताडोबा जंगल सफरीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी अभय जोशी (९९३०५६१६६७.) यांच्याशी संपर्क साधावा.

चला वाघ बघायला
‘निसर्ग टूर्स’तर्फे येत्या ६ ते १० मे, ३ ते ७ जून दरम्यान मध्य प्रदेशमधील बांधवगड राष्ट्रीय उद्यान सफारीचे आयोजन करण्यात आले आहे. बांधवगड हे ऐतिहासिक काळापासून राजघराण्याचे राखलेले जंगल आहे. परंतु या राजेशाहीच्या काळातच झालेल्या मोठय़ा शिकारीनंतर महाराज मरतडसिंह यांनी शिकारीवर बंदी घातली. या जंगलाचे एका राखीव वनामध्ये रूपांतर केले. हे जंगल पुढे १९७५ साली व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर झाले. एकूण ४४८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या या जंगलात वाघांशिवाय बिबटे, जंगली कुत्री, नीलगाय, चौशिंगा, भेकर, चिंकारा, रानडुक्कर, सांबर, चितळ, हनुमान लंगूर अशा अनेक प्राण्यांचे वास्तव्य आहे. अडीचशेहून अधिक जातींच्या पक्ष्यांचीही इथे नोंद झाली आहे. या सहलीमध्ये बांधवगडच्या जोडीनेच जबलपूरमधील भेडा घाटलाही भेट दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.