अथांग पसरलेल्या खोल समुद्रात एखादी छोटी वस्तू हरवली तर ती परत मिळण्याची शक्यता तशी शून्यच. सुदैवानं ती मिळालीच तर ती कशा अवस्थेत परत मिळले हे तुम्हाला पाहायचं असेल तर हा फोटो पाहा. तैवानमधल्या एका समुद्रात हरवलेला कॅमेरा जवळपास तीन वर्षांनंतर काही मुलांना सापडला पण हा कॅमेरा ज्या अवस्थेत मुलांना सापडला ते पाहणं खूपच भन्नाट होतं. या कॅमेरावर असंख्य समुद्री जीवांनी आसरा घेतला होता. वाळूचा, समुद्री शेवाळांचा इंचभर जाड थर कॅमेरावर होता. इतकंच नाही तर शिंपल्यांनी कॅमेऱ्याच्या संपूर्ण बॉडीवर वेगळंच जग निर्माण केलं होतं.

VIDEO : टीम ऑस्ट्रेलियाचा ‘शोले’ पाहिला नाही तर काय पाहिलं!

जपानमधल्या विद्यापीठात शिकत असणाऱ्या एक विद्यार्थीनीनं इशिगाकी किनाऱ्यावर आपला कॅमेरा हरवला होता. स्कूबा डाईव्ह करताना हा कॅमेरा समुद्रात कुठे गुडूप झाला तिचं तिलाही कळलं नाही. हा कॅमेरा आपल्याला कधीच मिळणार नाही असा समज तिचा झाला. तिनं याबद्दल फेसबुकवर पोस्टही लिहिली होती. तसेच हा कॅमेरा ज्याला मिळेल त्यानं तो परत करावा अशी विनंतीही तिनं केली होती. २०१५ मध्ये तिच्या हातून तो कॅमेरा हरवला होता. साधरण अडीच वर्षांनंतर याच समुद्रात शाळेतील विद्यार्थ्यांचा एक गट पोहोण्यासाठी गेला. त्यातल्या ११ वर्षांच्या मुलाला समुद्रात तो कॅमेरा सापडला.

Video : तिचा सुरेल आवाज ऐकून जगप्रसिद्ध पॉपस्टारच्या डोळ्यातही आलं पाणी

या कॅमेरावर असंख्य शिंपल्यांनी घर केलं होतं. त्यामुळे मोठ्या कुतूहलानं मुलांनी कॅमेरा हाताळला. आश्चर्य म्हणजे तो पूर्वीइतकाच चांगल्या स्थितीत होता. कॅमेरावर असलेल्या वॉटर गार्डमुळे पाण्याचा एक थेंबही कॅमेरात गेला नव्हता. विशेष म्हणजे अडीच वर्षे पाण्यात राहूनही कॅमेराची बॅटरी संपली नव्हती. या विद्यार्थ्यांना कॅमेराच्या मेमरी कार्डमध्ये असलेले काही फोटोही सापडले. जे कॅमेराच्या मूळ मालकिणीनं कॅमेरा हरवण्याआधी त्यात टिपले होते.