हा फोटो पाहून कोणाच्याही काळजात चर्र होईल. ना नशीबात मरण ना सुखानं जगणं अशी अवस्था शिकाऱ्यानं हरणांची केली होती. शरीरात बाण रुतलेल्या या हरणांना किती वेदना होत असतील याची कल्पना आपण करु शकत नाही. त्याची इतकी वाईट अवस्था करणाऱ्या शिकाऱ्याचा शोध ऑरेगॉन पोलीस घेत आहेत. या शिकाऱ्याची माहिती देणाऱ्यावर पोलिसांनी १ लाख ३३ हजारांहून अधिक रक्कम जाहीर केली आहे.

जखमी पण तरीही जिवंत असलेल्या या हरणांचा शोध पोलीस घेत आहेत. बाण रुतून बसलेले तरीही जिवंत असलेले एक नाही तर तीन किंवा त्याहून अधिक हरणं जंगलात फिरत आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी आणि जखमींवर इलाज करण्यासाठी पोलिस जंगलात त्यांचा शोध घेत आहेत. यासाठी काही दिवसांपूर्वी पोलिसांनी सोशल मीडियावर त्यांचे काही फोटो शेअर केले आहे. याबद्दल कोणतीही माहिती असेल तर त्वरित कळवावं असं आवाहन पोलिसांनी आजूबाजूच्या नागरिकांना केलं आहे.