‘स्पेस एक्स’ आणि ‘टेस्ला’ या आघाडीच्या ऑटोमोबाइल कंपनीचे मालक इलॉन मस्क यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. त्यांनी आपल्या मुलाचं नाव X Æ A-12 असं ठेवलं आहे. हे नाव पाहायला जितकं विचित्र आहे तितकच उच्चारयला सुद्धा. दरम्यान बाळाच्या नावाच्या उच्चारावरुन मस्क यांचे आपल्या पत्नी सोबत चक्क भांडण होत आहे.

boyfriend sent bride nude photos on groom mobile phone to break marriage
वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न
girl killed her mother with the help of friend
पुणे : धक्कादायक! मित्राच्या मदतीने मुलीने केला आईचा खून
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”
The maternal uncle of a young man whom a girl had married and his son was hit by a jeep while riding a bike
मुलीने प्रेमविवाह केलेल्या तरुणाच्या नात्यातील भावाला जीपखाली चिरडले

पेज सिक्सला दिलेल्या मुलाखतीत मक्स यांची पत्नी ग्रिम्स हिने बाळाचं नाव ‘अॅश’ असं उच्चारलं होतं. परंतु हा उच्चार मस्क यांना आवडला नाही. त्यांच्या मते बाळाचा उच्चार ‘एक्स’ असा केला जावा. जो रोगनसोबत केलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीमध्ये मस्क यांनी बाळाच्या विचित्र नावाचं स्पष्टीकरण दिलं. X Æ A-12 या नावामधील AE म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स. काही देशांमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससाठी AI ऐवजी AE ही अद्याक्षरं वापरतात. Æ चा उच्चार ‘अॅश’ असा करावा. X म्हणजे X हे बाळाचं मुख्य नाव आहे. आणि A-12चा अर्थ आर्कऐंजल म्हणजेच देवदूत असा होतो. असं मस्क म्हणाले.

इलॉन मस्क यांना रियल लाईफ आयर्नमॅन असंही म्हणतात. आर्यनमॅन चित्रपटांमधील टोनी स्टार्क जसा विक्षिप्त आहे. तसाच काहीसा विक्षिक्तपणा मस्क यांच्यामध्ये देखील आहे. मार्व्हल कॉमिक्समधील टोनीने देखील आपल्या मुलीचं नाव एक्स असं ठेवलं होतं. कॉमिक्स स्टोरीनुसार टोनीच्या एका आर्यन आर्मरचं नाव एक्स असं होतं. अद्यायावत तंत्रज्ञानाने भरलेल्या या आर्मरची निर्मिती त्याने आपल्या मुलीसाठी केली होती. असाच काहीसा प्रकार इलॉन मस्क यांनी आपल्या मुलासोबत केला की काय असा प्रश्न काही लोकांना पडला आहे.