24 September 2020

News Flash

‘Binod’, सोशल मीडियावर करोनापेक्षा वेगानं पसरतोय; जाणून घ्या का आणि कसा सुरु झाला ट्रेंड?

YouTube वरील बिनोद ट्विटरवर झाला ट्रेंड

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल त्याचा नेम नाही. सध्या सोशल मीडियावर बिनोद (Binod) या नावाची खूप चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रत्येक ठिकाणी बिनोद हे नाव दिसत आहे. या नावापासून लोकांनी अनेक मिम्स तयार केली आहेत. पाहता पाहता ट्विटरवर बिनोद ट्रेंड सुरु झाला होता.

कोण आहे बिनोद?
Binod ची सुरुवात Slayypoint च्या एका यूट्युब व्हिडीओमुळे झाली झाली. Slayypoint चॅनल लोकांसाठी अजबगजब असे रोस्ट व्हिडीओ तयार करतेय. १५ जुलै रोजी त्यांनी असाच एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओचं शिर्षक ‘Why indian comment section is garbage’असे होतं. कमेंटमध्ये भारतीय लोक काही कसं लिहतात असं, या व्हिडीओत असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर या व्हिडीओवर अनेक खूप कमेंट येऊ लागल्या. यादरम्यान Binod Tharu नावाच्या एका तरुणानं कमेंटमध्ये आपलेच नाव बिनोद लिहले. सात जणांनी त्याला लाइकही केलं. त्यानंतर लोकांनी यावरुन विनोद करायला सुरुवात केली. पाहता पाहता यावर मिम्सचा पाऊस पडला. करोना विषाणू जितक्या वेगानं पसरत आहे त्यापेक्षा वेगानं यावर मिम्स तयार होत आहेत. लोकांनी बिनोद नावावर आपली क्रिएटिव्हिटी वापरुन अनेक मिम्स आणि विनोद तयार केले आहेत. लोक प्रत्येक ठिकाणी बिनोद लिहू लागले त्यामुळे सोशल मीडियावर बिनोदमय झाली आहे.

पाहा तो व्हिडीओ –

ट्विटरवर सध्या #Binod हा टॉपिक ट्रेंड होत आहे. लोक आपलं कौशल्य आणि क्रिएटिव्हिटी पणाला लावून मिम्स तयार करत आहेत. पाहा असेच काही मिम्स…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 11:11 am

Web Title: everything is binod how one youtube comment triggered the most bizarre meme trend nck 90
Next Stories
1 UPSC परीक्षेत राहुल मोदीला मिळाला ४२० वा रँक; सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकुळ
2 मोदींनी योगींचं नावचं चुकवलं योगी आदित्यनाथ ऐवजी ‘आदित्य योगीनाथ’ म्हणाले अन्….
3 धक्कादायक! McDonald’s मधून मागवलेल्या चिकन नगेटमध्ये चक्क ‘फेस मास्क’, कंपनी म्हणते…
Just Now!
X