आज विकीपीडिया सुरु होऊन १७ वर्षे झाली असली तरी मराठीमध्ये विकीपीडिया सुरु होऊन १५ वर्षेही झालेली नाहीत. विकीपीडियाने २००३ साली महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी मराठीमध्ये सेवा उपलब्ध करुन दिली. जरी ही सेवा २००३मध्ये उपलब्ध करुन देण्यात आली तरी खऱ्या अर्थाने मराठी विकीपीडिया २००६ नंतर वाढत गेले.

विकीपीडियावरील माहितीनुसार आत मराठी विकीपीडियावर एकूण ४२ हजारहून अधिक लेख उपलब्ध आहेत. तर २०१२ पर्यंत मराठी विकीपीडियावरील रजिस्टर युजर्सची संख्या २३ हजार इतकी होती. मागील चार सहा वर्षांत या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अॅलेक्स या वेबसाईटनुसार सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या वेबसाईटच्या यादीमध्ये मराठी विकीपिडिया दहाव्या स्थानावर आहे.

‘वसंत पंचमी’ आणि बालकवींनी लिहीलेली ‘औंदूबर’ ही कविता यासंदर्भातील लेख हे मराठी विकिपीडीयावरील पहिले लेख आहेत. हे लेख २ मे २००३ रोजी अपलोड करण्यात आले आहेत. २००६ नंतर मराठी विकिपीडीयाचा प्रसार आणि प्रचार वेगाने झाला. युनिकोड हा मराठी विकीपीडियावरील प्रमुख इनपूट फॉण्ट आहे. तर काहीजण ‘इनस्क्रीप्ट’ फॉण्टचाही वापर करतात. ‘गुगल फोनेटीक ट्रन्सलिट्रेशन’च्या मदतीने अनेकजण मराठी विकीपिडियावर महितीची भर घालत असतात.

खेळ आकड्यांचा

मराठी विकीपीडियावरील एकूण अकाऊण्ट – ८३ हजार २०

एकूण लेख ५० हजार २९३

एकूण फाईल्स – १९ हजार ३२२

एकूण अॅडमिनिस्ट्रेशन्सची संख्या – ८

(माहितीचा स्रोत: विकीमिडिया फाउंडेशन)