आजपासून मोबाइल घ्यायचा असेल तर तुमच्या आमच्या खिशाला जास्त कात्री लागणार आहे. कारण आजपासून मोबाइलच्या किंमतीत वाढ झाली आहे. जीएसटी परिषदेच्या मार्चमध्ये झालेल्या बैठकीत मोबाइल किंमतीवरचा जीएसटी १२ वरुन १८ टक्के करण्यात आला आहे. १ एप्रिलपासून या निर्णय अमलात आणला जाईल असं केंद्राने म्हटलं होतं. त्यामुळे आजपासून मोबाइल खरेदी करण्यासाठी जाल तर तो १८ टक्के जीएसटी देऊन घ्यावा लागणार आहे. त्यामुळे अर्थातच मोबाइलची किंमत वाढली आहे.

Xiaomi इंडियाचे एम.डी. मनू कुमार यांनी ट्विटरवर Xiaomi मोबाइलच्या किंमती आजपासून तातडीने वाढल्याचं जाहीर केलं आहे.

Xiaomi, Rdmi, Poco या सगळ्या मोबाइलच्या किंमती वाढल्या आहेत. वाढलेल्या किंमती या फ्लिपकार्टवरही दाखवण्यात येत आहेत. POCO X 2 6GB+128GB हे मॉडेल आधी १६ हजार ९९९ रुपयांना मिळत होतं. जे आता १७ हजार ९९९ रुपयांना झालं आहे. त्याचप्रमाणे REDMI K20 6GB+64GB या मॉडेलची किंमतही २ हजार रुपयांनी वाढली आहे. अशाच प्रकारे इतर मोबाइलच्या किंमतीतही वाढ झाल्याचंही जैन यांनी स्पष्ट केलं.

१४ मार्च रोजी GST परिषदेची बैठक दिल्लीत पार पडली होती. या बैठकीत मोबाइल फोनवरचा GST हा १२ वरुन १८ टक्के करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार आजपासून मोबाइल महाग झाला आहे.