20 September 2018

News Flash

अजब ! या पार्लरमध्ये सोन्याच्या वस्तऱ्याने करतात दाढी 

तब्बल साडेदहा तोळ्याचा वस्तरा तयार करुन घेतला असून १८ कॅरेट सोन्याचा हा वस्तरा तीन लाख रुपयांना आहे

व्यवसाय म्हटला की त्यातील स्पर्धा आणि वेगळेपण जपण्याची धडपड आपसूकच आली. आपल्या व्यवसायाबाबत अनेक जण कमी-अधिक प्रमाणात पझेसिव्ह असतो. हा व्यवसाय वाढविण्यासाठी किंवा त्यातील वेगळेपण टिकवून ठेवण्यासाठी कोण कधी काय करेल सांगता येत नाही. आता हेच बघा ना सांगलीतील एका मेन्स पार्लरवाल्याने आपल्या पार्लरमध्ये दाढी करण्यासाठी खास सोन्याचा वस्तरा ठेवला आहे. या रसिकाचे नाव आहे रामचंद्र काशीद. आपला व्यवसाय ज्या वस्तूमुळे चालतो ती वस्तू व्यावसायिकाला विशेष प्रिय असते. काशीद यांनी तब्बल साडेदहा तोळ्याचा वस्तरा तयार करुन घेतला असून या वस्तऱ्याने दाढी करण्यासाठी त्यांच्याकडे खूप गर्दी होण्याची शक्यता आहे.

HOT DEALS
  • Gionee X1 16GB Gold
    ₹ 8990 MRP ₹ 10349 -13%
    ₹1349 Cashback
  • Lenovo Phab 2 Plus 32GB Gunmetal Grey
    ₹ 17999 MRP ₹ 17999 -0%
    ₹900 Cashback

१८ कॅरेट सोन्याचा हा वस्तरा तीन लाख रुपयांना घेतला असून काशीद यांनी या वस्तऱ्याने पहिल्यांदा आपल्या वडिलांची दाढी केली. याचे निमित्तही अनोखे होते. आई-वडिलांच्या लग्नाच्या ३३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांनी हा मुहूर्त साधला आहे. आता हा अनोखा सोन्याचा वस्तरा नेमका तयार कोणी केला असा प्रश्न तुम्हाला सहाजिकच पडला असेल. तर काशीद यांनी सुरुवातीला हा वस्तरा कोण बनवून देणार यासाठी खूप शोधाशोध केली, मात्र कोणीच तयार झाले नाही. अखेर सांगलीतील चंदूकाका सराफमधील मॅनेजर महावीर पाटील यांनी हे आव्हान स्विकारलं. पुण्यातील मिथुन राणा या कारागिराच्या मदतीने मोठ्या कष्टाने २० दिवसांत काशीद यांना हवा असलेला वस्तरा तयार झाला. आता या वस्तऱ्याने दाढी करायचे दर काशीद यांनी अजून जाहीर केले नाहीत. मात्र किमान एकदा तरी या वस्तऱ्याने दाढी करायची इच्छा सांगलीतील पुरुषांची असेल हे नक्की.

First Published on May 16, 2018 5:31 pm

Web Title: sangli barber using golden razor to shave beard cost 3 lacks