26 November 2020

News Flash

‘शिनचॅन’ नंबरात आला! भारतातील या कॉलेजच्या गुणवत्ता यादीत झळकला

'शिनचॅन नोहारा'ने केलं कॉलेजच्या मेरिट लिस्टमध्ये टॉप

गेल्या आठवड्यात कोलकाता आणि पश्चिम बंगालमधील महाविद्यालयील प्रवेश प्रक्रियेत काहीसा गोंधळ माजला होता. या महाविद्यालयांच्या पहिल्या मेरिट लिस्टमध्ये चक्क अभिनेत्री सनी लिओनी आणि प्ले-बॅक सिंगर नेहा कक्करचं नाव टॉपर म्हणून घोषित करण्यात आलं होतं. असाच काहीसा प्रकार पुन्हा घडला आहे. यावेळी प्रसिद्ध जॅपनिस कार्टून कॅरेक्टर ‘शिनचॅन नोहारा’ हे नाव एका कॉलेजच्या मेरिट लिस्टमध्ये टॉपर म्हणून झळकलंय.

पश्चिम बंगालमधील सिलिगुरी महाविद्यालयाची बी.एस.सी. मेरिट लिस्ट नुकतीच प्रसिद्ध झाली. ही यादी कॉलेजच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली होती. लक्षवेधी बाब म्हणजे या यादीमध्ये ‘शिनचॅन नोहारा’ हे नाव पहिल्या क्रमांकावर होते. त्यानंतर तातडीने कॉलेज प्रशासनाने चूक दुरूस्त करत नवीन यादी जाहीर केली. याबाबत स्थानिक पोलीस स्टेशन आणि पश्चिम बंगाल पोलिसांच्या सायबर शाखेकडे तक्रार केली आहे. पोलिसांमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 5:57 pm

Web Title: shinshan nohars name appears in the merit list of college mppg 94
Next Stories
1 नकारात्मक जीडीपी पाहून विरोधकही म्हणाले, “पटलं बुवा, #ModiHaiToMumkinHai’
2 ‘ये दिल मांगे मोर’, म्हणत प्रशांत भूषण यांनी GDP वरुन साधला मोदी सरकारवर निशाणा
3 मोदी जॅकेटनंतर आता तामिळनाडूत ‘मोदी इडली’; किंमत फक्त…
Just Now!
X