आतापर्यंत आपण रांगोळी, चित्र तसंच वेगवेगळ्या माध्यमातून कलाकरांनी शिवराज्याभिषेक सोहळा साकारल्याचं पाहिलं आहे. पण सांगलीत चक्क ‘क्विल्ट’ म्हणजेच गोधडीवर शिवराज्याभिषेक सोहळा साकारण्याची कामगिरी महिला आर्किटेक्ट श्रुती दांडेकर यांनी केली आहे. 19 बाय 8 फुटांची ही गोधडी साकारण्यासाठी त्यांनी तब्बल 20 हजार 888 कोटी कपड्यांचे तुकडे वापरले. यामध्ये 288 रंगांच्या छटांचा वापर करण्यात आला.
सांगलीत नुकतंच या गोधडीचं अनावरण करण्यात आलं. 20 हजार 888 कापडी तुकडे, 288 रंगछटा आणि 19 बाय 8 फुटांचा हा राज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करु लागले आहेत. या ‘क्विल्ट’ मध्ये अगदी 3 मिमी इतक्या लहान कपड्यांच्या तुकड्याचा समावेश आहे.
ही गोधडी साकारण्यासाठी श्रुती दांडेकर यांना तब्बल 10 महिने लागले. यासाठी त्यांनी ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ बाबासाहेब पुरंदरे यांचं मार्गदर्शन घेतलं होतं. पुण्याच्या मनीषा अय्यर यांच्या स्टुडिओ बानीमध्ये शिवणकामाचे काम पूर्ण करण्यात आले. ही गोधडी चेन्नई येथे होणाऱ्या इंडिया क्विल्ट फेस्टिवलमध्ये सादर केला जाणार आहे. 25 ते 27 जानेवारीदरम्यान हा फेस्टिव्हल पार पडणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 17, 2019 12:58 pm