News Flash

VIDEO : ही हृदयस्पर्शी प्रेमकथा तुम्हालाही नवी उमेद देईल

पहिलं प्रेम...त्या जुन्या आठवणी

छाया सौजन्य : टेप अ टेल, युट्यूब

पहिलं प्रेम..त्या जुन्या आठवणी..सोडून गेलेला तो…आणि बरंच काही…कसं विसरावं? अनेकांनाच हा प्रश्न पडतो. पहिल्या प्रेमाची जादूच काही वेगळी असते. लहानपणी तुम्हीही एखाद्याच्या प्रेमात पडला असाल. ते प्रेम जरी तुम्हाला मिळालं नसलं तरी हृदयात कुठेतरी ती व्यक्ती असते. सिल्विना जेनिफर या तरुणनेही अशीच एक हृदयस्पर्धी पण अपुरी प्रेमकथा सांगितली. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेकांना जगण्याची, पुन्हा प्रेम करण्याची नवी उमेद देत आहे.

१० वर्षांची असताना सिल्विनाची एका लग्नसोहळ्यात त्याच्याशी ओळख होते आणि दोघांमध्ये मैत्री जमते. पण जसजसे ते मोठे होत गेले, तसतसा त्यांच्यातील संपर्क कमी होऊ लागला. तो मुलगा दुसरीकडे राहायला गेला. २०११ मध्ये सोशल मीडियाच्या साहाय्याने सिल्विना पुन्हा एकदा त्याच्या संपर्कात आली. मुलाच्या आईवडिलांनी तिला लग्नासाठीही विचारले, पण त्यावेळी तिने नकार दिला. कारण एकमेकांवर प्रेम करून त्यानंतर लग्न करावं अशी तिची इच्छा होती. काही दिवसांनंतर त्या मुलाचे दुसरीकडे लग्न जुळल्याची माहिती तिला मिळाली. पण नियतीनेही काही वेगळेच निश्चित केले होते. काही कारणांमुळे त्या मुलाचे लग्न मोडले आणि पुन्हा एकदा तो सिल्विनाच्या संपर्कात आला. दोघांमधील जुनी मैत्री पुन्हा एकदा बहरू लागली. मैत्रीचे रुपांतर प्रेमातही झाले पण अचानक अनपेक्षित अशी घटना घडली.

जेनिफरची ही प्रेमकथा अपुरी जरी असली तरी अनेकांना नवी उमेद देत जीवनाची सकारात्मक बाजू सांगत आहे. व्हिडिओच्या अखेरीस तिने दिलेला संदेश तुम्हालाही एक नवी उमेद देऊ शकेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2018 1:01 am

Web Title: this incomplete love story will leave you empty at first but will fill you with hope watch video
Next Stories
1 ड्यू प्लेसीनं घेतलं रबाडाचं चुंबन, प्रेयसी झाली नाराज
2 शरीरावरच्या टॅटूमुळे टोळीच्या म्होरक्याला पकडण्यात पोलिसांना यश, १३ वर्षांपासून होता फरार
3 VIDEO: ‘त्या’ ग्राहकाला मारण्यासाठी वेबसाईटच्या मालकाने ८०० किमीचा प्रवास केला
Just Now!
X