19 September 2020

News Flash

साप आणि माणूस, एकमेकांना चावल्याने दोघांचा मृत्यू

रागातून सापाला चावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

प्रतिकात्मक फोटो

गुजरातमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साप दंश केल्याच्या रागातून एका व्यक्तीने सापाचा चक्क सापाचा चावा घेतला. यामध्ये साप आणि माणूसाचाही मृत्यू झाला आहे. गुजरातमधील अजन्वा या गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

शनिवारी ४ मे रोजी अजन्वा गावातील ७० वर्षीय पर्वत गाला बारिया यांना सापाने दंश केला. पर्वत हे व्यवसायाने शेतकरी आहेत. सापाने दंश केल्यानंतर रागामध्ये त्यांनीही सापाचा चावा घेतला. उपचारासाठी त्यांना गोध्रा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. पर्वत यांनी चार तास मृत्यूशी झुंज दिली मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू दिला.

स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, सापाने दंश केल्यानंतर पर्वत यांनी उल्टी करत सर्व विष सापावर टाकण्याचा प्रयत्न केला. बदल्याच्या रागातून पर्वत यांनी सापाला पकडून चावा घेतला. तेथे उपस्थित असलेल्या एका नातेवाईकाने याची माहिती पर्वत यांच्या घरी दिली. कुटुंबियांनी मेलेल्या सापाला जाळले. त्यानंतर उपचारासाठी त्यांना जवळील लुनावडा रूग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना गोध्रा रूग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. पर्वत यांनी चार तास मृत्यूशी झुंज दिली मात्र, उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2019 5:44 pm

Web Title: vadodara man bites snake after it bit him dies
Next Stories
1 Fact Check: वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान ‘बर्थ डे बम्पस’मुळे झाला तरुणाचा मृत्य?
2 ‘श्वान’दार… आणि लावलं सिंहाला पिटाळून, पहा Video
3 1 रुपयात खरेदी करा 24 कॅरेट सोनं, Paytm ची भन्नाट ऑफर
Just Now!
X