एकीकडे संपूर्ण देश करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करत असताना, आसाम राज्य पूर आणि करोना अशा दुहेरी संकटाचा सामना करत आहे. गेल्या काही दिवसांपासून आसाममध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. ब्रम्हपुत्रा नदीने आपली धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे संपूर्ण राज्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत ८५ जणांनी आपले प्राण गमावले असून एनडीआरएफतर्फे बचावकार्य सुरु आहे. मात्र या बचावकार्यामध्ये खुमाती येथील भाजपाचे आमदार मृणाल सैकियाही सहभागी झाल्याचे पहायला मिळालं. त्यांनीच बचावकार्याचा व्हिडिओ आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट केला आहे.

“माझ्या मतदारसंघामध्ये पुराने थैमान घातलं आहे. आम्ही अंतर्गत भागामध्ये अडकलेल्यांची सुटका करत आहोत,” अशा कॅप्शनसहीत सैकिया यांनी बचावकार्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये सैकिया स्वत: कंबरेपर्यंतच्या पुराच्या पाण्यात उतरुन लोकांना मदत करताना दिसत आहेत.

लोकांबरोबरच सैकिया यांच्याबरोबर असलेल्या बचावकार्य करणाऱ्या पथकाकडून ठिकठिकाणी अडकलेल्या पाळीव पाण्यांचीही सुटका करत आहेत. आम्ही अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेळ्या मेंढ्या वाचवल्याचा मला आनंद आहे असं सैकिया यांनी

द क्विंटने दिलेल्या वृत्तानुसार पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सैकिया यांनी कम्युनिटी किचनची सेवा सुरु केली असून त्या माध्यमातून लोकांना मोफत अन्न पुरवले जात आहे. सैकिया स्वत: बोटीमधून ठिकठिकाणी अडकलेल्यांना अन्नवाटप करण्यासाठी जातात. सैकिया यांच्या या कामाचे नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे.

राजकारण्यांनी हे असं वागलं पाहिजे

छान दादा

तुमच्या कामाला सलाम

तुमच्यासारखं कोणीच नाही

तुमच्यासारखा आमदार आहे हे चांगलं आहे

आसाममधील २८ जिल्ह्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. ३३ लाख नागरिकांना या पुराचा फटका बसला आहे.