scorecardresearch

Premium

शिवकन्या! “गडाच्या पायथ्याशी माती का गोळा करतेस?” सहा वर्षाच्या चिमुकलीने दिले असे उत्तर की डोळ्यात पाणी येईल

या व्हिडीओमध्ये एक चिमुकली गडाच्या पायथ्याशी माती गोळा करत असते. गडाखाली जाताना एक ट्रेकर तिला विचारतो की तु माती का गोळा करतेस त्यावर ती चिमुकली जे उत्तर देते ते ऐकून तुमच्या डोळ्यांत पाणी येऊ शकते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

6 years old child told the reason why she is collecting soil at starting point of fort emotional video goes viral
शिवकन्या! "गडाच्या पायथ्याशी माती का गोळा करतेस?" सहा वर्षाच्या चिमुकलीने दिले असे उत्तर की डोळ्यात पाणी येईल (Photo : Instagram)

Viral Video : सोशल मीडियावर गडकिल्ल्यांचे अनेक व्हिडीओ किंवा फोटो व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ अचंबित करणारे असतात तर काही व्हिडीओ अंगावर काटा आणणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली गडाच्या पायथ्याशी माती गोळा करत असते. गडाखाली जाताना एक ट्रेकर तिला विचारतो की तु माती का गोळा करतेस त्यावर ती चिमुकली जे उत्तर देते ते ऐकून तुमच्या डोळ्यांत पाणी येऊ शकते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज लाखो लोकांसाठी प्रेरणेचे केंद्र आहे. दर दिवशी हजारो शिवप्रेमी त्यांना मानवंदना देण्यासाठी गडकिल्ल्यांची सैर करतात. सोशल मीडियावर या शिवप्रेमींचे अनेक व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. त्यातलाच हा चिमुकलीचा व्हिडीओ. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक चिमुकली गडाच्या पायथ्याशी माती गोळा करत असते. तेव्हा एक ट्रेकर तिला विचारतो, “तु काय करतेस” त्यावर चिमुकली जे उत्तर देते ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. चिमुकली म्हणते, “मी माती गोळा करतेय. कारण या मातील आपल्या मावळ्यांचं रक्त सांडलं. किती पवित्र माती आहे.”

loksatta analysis report on status of leopards in india
विश्लेषण : बिबटे वाढलेत… शेतात, गावच्या वेशीवर आणि सिमेंटच्या जंगलातही!
Two kilos of ganja seized in Kondhwa area one arrested
कोंढवा परिसरात दोन किलो गांजा जप्त; गांजा विक्री प्रकरणात सराईत अटकेत
Chandrapur, Murder Case, Friend Killed, Buried, dumping yard, five arrested,
चंद्रपूर : मित्राची हत्या करून मृतदेह कचऱ्याच्या डम्पिंग यार्डमध्ये पुरला, पाच मित्र पोलिसांच्या ताब्यात
Illegal parking of two-wheelers in two rows on Phadke Road
डोंबिवली : वर्दळीच्या फडके रोडवर दोन रांगांमध्ये दुचाकींचे बेकायदा वाहनतळ

हेही वाचा : बहीण ही नेहमी दुसरी आई असते! चिमुकल्या भावाबरोबर शाळेत जातानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

sharvika_mhatre या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “काल पांडवगड किल्ला सर करून गडाखाली येताना शर्विका नेहमीप्रमाणे गडाच्या पायथ्याशी माती गोळा करत होती, तेव्हा एका ट्रेकर ने विचारले की तू ही माती का गोळा करतेस? त्यावर तिने दिलेले उत्तर ऐकून आमच्या सर्वांच्या अंगावर काटा आला आणि डोळ्यात पाणी आले….आज चारशे वर्ष लोटली तरी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे शौर्य आणि विचार ह्या मातीत जिवंत आहेत..”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “जय जिजाऊ जय शिवराय… तुझ्या सारखी गोड जिजाऊ या देशात जन्माला आली.. जय महाराष्ट्र” तर एका युजरने लिहिलेय, ” डोळयात पाणी आणले लाडके तु…” तर एका युजरने लिहिलेय, “माझ्याकडे बोलायला शब्द नाही”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 6 years old child told the reason why she is collecting soil at starting point of fort emotional video goes viral chhatrapati shivaji maharaj shivkanya ndj

First published on: 05-12-2023 at 09:53 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×