Video : एस.एस. राजामौली दिग्दर्शित बाहूबली हा तमिळ चित्रपट तुम्ही पाहिला असेल. हा चित्रपट इतका जास्त प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता की यातील प्रत्येक सीन लक्षात राहण्यासारखा होता.
बाहूबली २ च्या एका सीनमध्ये दाखवले आहे की देवसेना नावेत जाण्यासाठी थेट बाहूबलीच्या खांद्यावरुन जाते. अशा गोष्टी चित्रपटात घडताना आपण अनेकदा पाहिले असेल पण प्रत्यक्ष आयुष्यातही असे कधी घडू शकते याची कल्पना देखील तुम्ही केली नसेल. पण हे खरंच घडले आहे.
एका प्रियकरानेही आपल्या प्रेयसीसाठी असंच काहीसे केले आहे ज्याचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका खडकावरुन दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी तरुणीला भीती वाटत असते आणि त्याचवेळी तिचा प्रियकर तिच्यासाठी बाहूबलीसारखा मदतीला धावून येतो. चित्रपटातील बाहबुलीप्रमाणे हा तरुण दोन खडकांवर तोल सावरून पालथा झोपतो. एका खडकावर त्याचे पाय टेकवलेले दिसत आहे आणि दुसऱ्या खडकावर त्याने हात टेकवले आहे. त्यानंतर ती तरुणी त्याच्या अंगावरुन जाते आणि खडक पार करते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
big_bhojpuri.45 या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी एकापेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी तरुणाचे कौतुक केले आहे.
एका युजरने लिहिले, “असा प्रियकर नशीबवाल्यांना भेटतो.” एका युजरने लिहिले, “यालाच खरं प्रेम म्हणतात” आणखी एका युजरने लिहिले, “प्रेम असावे तर असे”