Viral Video : लहान मुलांचे सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके मजेशीर असतात की पोट धरुन हसायला येते. तुम्ही लहान मुलांना मजामस्ती करताना पाहिले असेल किंवा हसताना किंवा रडताना पाहिले किंवा एखाद्या गोष्टीचा हट्ट करताना पाहिले असेल. खरं तर लहान मुले खूप हट्टी असतात. त्यांना जर एखादी गोष्ट आवडली असेल किंवा हवी असेल तर ते ती गोष्ट मिळवण्यासाठी खूप हट्ट करतात पण एका मुलीने अशा गोष्टीचा हट्ट केला आहे, की तुम्हीही कल्पनाही करू शकणार नाही. सध्या या चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही चिमुकली रडत रडत आईकडे “मला नवरा पाहिजे” असा हट्ट करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही अवाक् होईल.

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला चिमुकली रडताना दिसेल. तेव्हा कॅमेरा पकडून असलेले व्यक्ती (कदाचित चिमुकलीचे बाबा असावेत) ते चिमुकलीला विचारतात की तुला काय पाहिजे? तेव्हा ती रडत रडत “नवरा” म्हणते. त्यानंतर तिची आई तिला समजावते आणि म्हणते, “अगं नवरा पाहिजे तुला, तु आधी मोठी तर हो.. आत्तु सारखा नवरा पाहिजे ना तुला.. आत्तु मोठी झाली बाळा” हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. चिमुकलीचा हा हट्ट पाहून तुम्हीही डोकं धराल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

a girl cleaning shaved by sitting in salon
अरे देवा! सलुनमध्ये बसून चक्क दाढी करत होती तरुणी, VIDEO पाहून तुम्हीही चक्रावून जाल
young Man takes selfie with leopard
Video : “डर के आगे जीत है..” शेतकरी तरुणाने घेतली चक्क चित्ताबरोबर सेल्फी, शेतातील व्हिडीओ होतोय व्हायरल
Jugaad Video
चावी न वापरता सुरू करता येईल स्कुटी! अनोखा जुगाड पाहून तुम्हीही व्हाल अवाक्, पाहा व्हिडीओ
how to check purity of wheat flour
Kitchen Jugaad : गव्हाचे पीठ भेसळयुक्त आहे की नाही, कसे ओळखायचे? ही सोपी ट्रिक लक्षात ठेवा

हेही वाचा : पाकिस्तानी गायिकेला ‘हनिमून’ विषयी विचारला प्रश्न; लाइव्ह शोमध्येच होस्टच्या कानाखाली लगावली, पाहा धक्कादायक व्हिडीओ

natkhat_nayu या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “नवरा पाहिजे, नवरा आता कुठून आणून देऊ” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजने लिहिलेय, “निरागसता” तर एका युजरने लिहिलेय, “हा व्हिडीओ जपून ठेवा ती मोठी झाली की दाखवा” आणखी एका युजरने मजेशीरपण लिहिलेय,”काकी तिला भवरा पाहिजे असेल खेळायला आणि तुम्ही नवरा समजत आहेत” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.