scorecardresearch

घाटातून जाणाऱ्या कारवर अचानक कोसळला भलामोठा दगड, अंगावर शहारा आणणाऱ्या घटनेचा Video व्हायरल

‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ असं कशाला म्हटलं जातं याच उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडीओ आहे.

car accident
अचानक भलामोठा दगड गाडीवर पडला अन्… (Photo : Twitter)

सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडिओ असे असतात जे पाहून आपल्या अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका कारला झालेला अपघात पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास कठीण होणार आहे. आपण सोशल मीडियावर किंवा टीव्हीवर दररोज अनेक अपघातांचे व्हिडीओ पाहत असतो. पण सध्या ज्या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, तसा अपघात कदाचित तुम्ही पाहिला नसेल. हो कारण एका कारवर भलामोठा दगड पडूनही कार चालक सुखरुप असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे नेटकरी या कार चालकाला नशिबवान असल्याचं म्हणत आहेत.

‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ असं कशाला म्हटलं जातं याच उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हायरल व्हिडीओ आहे. हो कारण एखाद्याचं नशीब चांगलं असेल, तर भयंकर अपघातांमधूनही असे लोक बचावतात. व्हायरल होत असलेल्या अपघाताच्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सुदैवाने एका कार चालकाचा जीव बचावला आहे.

अचानक भलामोठा दगड गाडीवर पडला अन्…

हेही पाहा- वयस्कर व्यक्तीच्या मदतीसाठी पोलिसांनी केलं असं काम…, व्हायरल Video पाहून तुम्हीही कौतुक कराल

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ डोंगराळ भागातील आहे. या व्हिडीओमध्ये एका घाटातून दोन कार जाताना दिसत आहेत. यावेळी पुढच्या क्षणी काय होणार याची कल्पनाही कार चालकांनी केली नसेल, कारण कार धावत असतानाच अचानाक डोंगरावरून एक मोठा दगड घसरुन गाडीच्या बोनेटवर पडतो आणि क्षणात कार जागेवर फिरते. हा अपघात इतका भयंकर आहे की तो पाहिल्यानंतर अनेकांच्या अंगावर काटा आला आहे.

थोडक्यात बचावला चालक –

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ड्रायव्हरचा जीव थोडक्यात वाचल्याचं दिसत आहे. गाडी काही इंच पुढे गेली असती तर चालकाला आपला प्राण गमवावा लागला असता. पण ड्रायव्हरचे नशीब चांगले असल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. शिवाय हा भलामोठा दगड कारच्या छतावर पडला असता तर काय झाले असते याची कल्पना न केलेलीच बरी. तर गाडीवर दगड ज्या ठिकाणी पडला तिथे काय झालं आहे हे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

डोंगराळ भागात असे धोके असतातच –

ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @ViciousVideos नावाच्या अकाऊंटवरुन या थरराक घटनेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत असून त्याला आतापर्यंत तो एक लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेकजण ड्रायव्हर नशिबवान होता म्हणूनच तो बचावला असल्याचंही म्हणत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 10:42 IST

संबंधित बातम्या