अशा अनेक धाडसी पोलिसांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, जे स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवतात. अनेकवेळा पोलिस कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय असे शौर्य दाखवतात. पुन्हा एकदा असाच एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पोलिसांनी शौर्य दाखवत एका व्यक्तीचा जीव वाचवला आहे. या व्हिडिओमध्येही एका व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करत होता, मात्र तेवढ्यात पोलिस कर्मचाऱ्याने असे शौर्य दाखवले जे पाहून तुम्हीही कौतुक कराल.

हा व्हायरल व्हिडीओ मेक्सिकोचा असल्याचे सांगितले जात आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करताना दिसत आहे. वास्तविक, या व्यक्तीला पुलावर चढून खाली उडी मारायची आहे. त्याच्या समोर उभे असलेले काही लोक आणि पोलीस त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात, मात्र तो त्यांच्याशी वाद घालू लागला. पोलीस त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न करतात पण तो एकत नाही. तेवढ्यात मागून त्याच पुलावर बसलेला एक पोलिस हळूच त्या व्यक्तीकडे जाऊ लागतात. त्यानंतर त्या व्यक्तीच्या समोर उभे असलेले बाकीचे पोलीस त्याचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करू लागतात. तेव्हाच पुलावर बसलेले पोलीस त्या व्यक्तीला पकडतो आणि पुढे उडी मारतो. त्यानंतर तिथे उपस्थित असलेले बाकीचे पोलिसही त्या व्यक्तीला पकडतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचाअर्धनग्न करत लाथाबुक्क्यांचा मार, नंतर तोंडाने उचलायला लावला बूट; मध्य प्रदेशातील संतापजनक VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यूजर्स सतत कमेंट करत आहेत. बहुतेक वापरकर्त्यांनी त्या पोलिसाला नायक म्हटले. यापूर्वीही असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या घटनेत एका महिलेला उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करायची होती, मात्र पोलिसांनी तत्काळ जाळी टाकून तत्परता दाखवून तिला आत्महत्या करण्यापासून वाचवले.