Viral Video : सोशल मीडियावर शाळेतील गंमती जमतीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच पोट धरुन हसायला येईल असा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लपून फोनवर बोलणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकाने असे रंगेहाथ पकडले की तुम्हालाही हसू आवरणार नाही. सध्या हा मजेशीर व्हिडीओ चर्चेत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ एका वर्गातील आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक विद्यार्थी लपून फोनवर बोलत आहे. शिक्षकांना दिसू नये म्हणून तो मान खाली घालून फोनवर बोलतोय. पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की शिक्षक गपचूप विद्यार्थ्याच्या शेजारी जाऊन बसतात. वर्गातील इतर विद्यार्थांना हसू आवरत नाही आणि ते जोरजोराने हसताना दिसत आहे. फोनवर बोलत असलेल्या विद्यार्थ्याचे काहीही लक्ष नसते पण जेव्हा फोन ठेवतो, तेव्हा त्याला दिसते की शिक्षक आपल्या समोर बसलेले आहे. हा मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हेही वाचा : Mumbai Video : भोळ्या शंकराची भोळी भक्त! शिवशंकराबरोबर एकटीच बोलत होती वृद्ध महिला; मुंबईच्या सीएसटी येथील व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

sarcastic__parv या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर एकापेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया आल्या आहेत. एका युजरने मिश्किलपणे लिहिले, “बापरे, विद्यार्थ्याला हार्ट अटॅक आला असता तर…” तर एका युजरने लिहिले, “गेम ओव्हर” आणखी एका युजरने लिहिले, “शिक्षक खरंच खूप मजेशीर आहेत..”