scorecardresearch

जुळ्या मुलांचं अनोखं बेट! यामागील कारण कोणालाच माहीत नाही

चार महिन्यांच्या लहान मुलांपासून ते ८६ वर्षांच्या जुळ्या वृद्धांपर्यंत इथे दिसतात. याच कारण शोधण्यासाठी कोणतेही शास्त्रीय संशोधन झालेले नाही.

unique island of twins
जुळ्या मुलांचं अनोखं बेट! (फोटो: Pixabay)

जुळी मुले नेहमीच आकर्षणाचे केंद्र असतात. जेव्हा ते गर्दीत बाहेर पडतात तेव्हा लोक त्याच्याकडे नक्कीच पाहतात. याच कारण जुळ्या मुलांचे दर्शन हे अत्यंत दुर्मिळ दृश्य आहे. पण आज आम्ही तुम्हाला फिलिपाइन्समधील एका बेटाबद्दल सांगणार आहोत जिथे जुळ्या मुलांची लोकसंख्या खूप जास्त आहे. सगळ्यात गंमत म्हणजे प्रत्येक तिसऱ्या घरात जुळी मुलं असतात.

फिलीपिन्स बेटावर वसलेले अलाबात हे गाव मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे, तसेच नैसर्गिक सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. पण आणखी एक गोष्ट आहे जी या बेटाला खास बनवते आणि ती म्हणजे ट्विन्स आयलंडची लोकसंख्या. गावात (ट्विन्स व्हिलेज फिलीपिन्स) अशी अनेक जुळी मुले आहेत जी कदाचित जगात कोठेही नसतील. जर तुम्ही या बेटावर पोहोचलात तर अशीच माणसे पाहून तुमही चक्रवाल हे निश्चित.

गावात अनेक जुळी मुले आहेत

द सन वेबसाइटच्या २०१८ च्या अहवालानुसार, अल्बर्टामध्ये १५,००० कुटुंबं राहतात, त्यापैकी सुमारे १०० जुळी मुले आहेत. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे या गावात असे का आहे हे कोणालाच माहीत नाही. चार महिन्यांच्या लहान मुलांपासून ते ८६ वर्षांच्या जुळ्या वृद्धांपर्यंत इथे दिसतात.

(हे ही वाचा: १३ कोटी भरून मॉडेलने ‘या’ विशेष भागाचा उतरवला विमा! कारण जाणून वाटेल आश्चर्य )

लोकांचा होतो गोंधळ

द सन वेबसाइटशी बोलताना गावात राहणाऱ्या अँटोनिया नावाच्या महिलेने सांगितले की, जेव्हा तिचे लग्न झाले तेव्हा तिच्या नवऱ्याला तिच्या आणि तिच्या बहिणीमध्ये गोंधळ होयचा. अनेकवेळा अशा घटनाही घडल्या ज्यात दोघांनाही लाजिरवाणे व्हावे लागले. त्यानंतर अँटोनियाने तिच्या पतीला सांगितले की तिच्या नाकावर तीळ आहे तर तिच्या बहिणीच्या नाकावर तीळ नाही. येथे राहणारी जुळी मुले कपड्यांमध्येही सारखीच दिसतात. ते अनेकदा एकाच प्रकारचे कपडे घालतात.

(फोटो: Reddit)

( हे ही वाचा: T20 WC 2021: पाकिस्तानच्या पराभवानंतर छोट्या चाहत्याला अश्रू अनावर; शोएब अख्तरने केला व्हिडीओ शेअर )

रिपोर्ट्सनुसार, येथील महिलांनी प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी विशेष औषधे घेतली होती, त्यानंतर १९९६ ते २००६ या काळात ३५ वर्षांच्या महिलांमध्ये एकाधिक गर्भधारणेमध्ये १८२ टक्क्यांनी वाढ झाली. मात्र, येथे किती जुळी मुले जन्माला आली हे शोधण्यासाठी येथे कोणतेही शास्त्रीय संशोधन झालेले नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-11-2021 at 11:09 IST

संबंधित बातम्या