Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. प्रत्येक दिवशी सोशल मीडिया नवीन काहीतरी पाहायला मिळते. कधी कोणी डान्स करताना दिसतात तर कधी कोणी भांडण करताना दिसतात. याशिवाय सार्वजानिक ठिकाणी स्टंट करणे, वाद घालणे, इत्यादी घटनांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच काही हटके व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक भिकारी भिक मागताना दिसत आहे पण पुढे जे काही घडतं, ते पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ ट्रॅफिक सिग्नलवरील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एका चारचाकीजवळ एक भिकारी उभा असलेला दिसेल. हा भिकारी भिक मागताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल चारचाकीमध्ये बसलेली महिला म्हणते, “सुट्टे पैसे नाही” पण पुढे जे काही घडते ते पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. भिकारी त्यावर म्हणतो, “मी सुट्टे पैसे देणार” त्यानंतर महिला म्हणते, “माझ्याकडे कार्ड आहे त्यानंतर भिकारी लगेच म्हणतो, “माझ्याकडे मशीन आहे” त्यानंतर भिकारी त्याच्या पिशवीतून कार्ड स्वाइप करणारी मशीन बाहेर काढतो. हे पाहून ती महिला अवाक् होते आणि तिला हसू आवरत नाही. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. तुम्हालाही हा व्हिडीओ पाहून हसू येईल.

हेही वाचा : अवघ्या एका सेकंदात सोडवून होणार रुबिक क्यूबचे कोडं; पट्ठ्याचा जबरदस्त उपाय VIDEO तून पाहा

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : बापरे! घरच्यांना कळू नये म्हणून लपवली चक्क चप्पलमध्ये सिगारेट अन् आगपेटी, तरुणाचा जुगाड पाहून तुम्हीही डोकं धराल!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

sarcasticschool_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “एक हूशार भिकारी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “व्यावसायिक गरीब” तर एका युजरने लिहिलेय, “प्रत्येक सुविधा उपलब्ध आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “यांना पाहून कळते की हे परिस्थितीमुळे नाही तर सवयीमळे पैसे मागतात आणि यांच्यामुळेच आपण कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. व्हिडीओ पाहून अनेक युजर्सना धक्का बसला आहे. काही युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.
यापूर्वीही भिकारीचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काही भिकारी क्युआर कोड बरोबर ठेवताना दिसून आले पण कार्ड स्वाइप मशीन ठेवणारा भिकारी तु्म्ही पहिल्यांदाच पाहिला असेल.