Viral Video : लावणी हे महाराष्ट्राचे लोकनृत्य असून जगप्रसिद्ध आहे. मराठी लोकनाट्यामध्ये लावणीचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सोशल मीडियावर अनेक जण लावणी सादर करताना दिसतात. हल्ली पुरुष मंडळी सुद्धा लावणी सादर करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण खूप सुंदर लावणी सादर करताना दिसतो. त्याची लावणी नृत्य पाहून तुम्हीही भारावून जाल. तो एका कॉलेजच्या कार्यक्रमात लावणी सादर करताना दिसतो.

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तु्म्हाला दिसेल की मुंबई येथील सर सीताराम आणि लेडी शांताबाई पाटकर कला आणि विज्ञान महाविद्यालयाला ६० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात हा तरुण नृत्य सादर करताना दिसतो. त्याने कुर्ती आणि धोती पॅन्ट घातली आहे. पिरतीच्या झुल्यात झुलवा या लोकप्रिय लावणी गीतावर हा तरुण नृत्य करत आहे. लावणी सादर करताना तो गीताच्या प्रत्येक लिरिक्सवर अनोख्या स्टेप्स आणि चेहऱ्यावर सुंदर हावभाव दाखवताना दिसतो. त्याच्या लावणी स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. तो इतका सुंदर डान्स करताना दिसतो की एखादी लावणी नटीही त्याच्यापुढे मागे राहील. त्याच्या प्रत्येक स्टेपवर कॉलेजमधील विद्यार्थी टाळ्या वाजवताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

child girls perform amazing dance on dhol tasha
ढोल ताशाच्या गजरात चिमुकल्या मुलींनी केला अप्रतिम डान्स, ऊर्जा पाहून तुम्हीही व्हाल फॅन
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे
girl playing holi with boyfriend while standing on moving scooter
चालत्या स्कुटीवर उभे राहून तरुणाला रंग लावत होती तरुणी! अचानक ब्रेक दाबला अन्…. व्हिडीओमध्ये बघा पुढे काय घडले

हेही वाचा : Mumbai Video : लोकलच्या महिला डब्यात महिलांचाच राडा, व्हिडीओ होतोय व्हायरल

pawan_tatkare या इन्स्टाग्राम अकाउंटवरू हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पिरतीच्या झुल्यात झुलवा ” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर लावणी” तर एका युजरने लिहिलेय, “त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव अप्रतिम” आणखी एका युजरने लिहिलेय, “मुली फेल आहे तुझ्यासमोर”

कोण आहे हा तरुण?

लावणी सादर करणारा हा तरुण एक लोककलाकार आहे. त्याचे नाव पवन तटकरे आहे. तो खूप चांगला डान्सर आणि कोरिओग्राफर आहे. त्याला अनेक ठिकाणी पाहूणे म्हणून आमंत्रित केले जाते. त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून कळते तो काही सार्वजानिक कार्यक्रमात लावणी सादर करतो तर काही ठिकाणी परिक्षकची भूमिका सुद्धा पार पाडतो. त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन तो डान्सचे अनेक व्हिडीओ शेअर करत असतो. इन्स्टाग्रामवर त्याचे असंख्य फॉलोवर्स आहे.