Anand Mahindra Shares Adorable Video: सध्या जगभरातील अनेक देशांमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. या पावसाचा फटका फक्त माणसांनाच नाही तर मुक्या जनावरांना देखील सहान करावा लागत आहे. अचानक उद्धवलेली पुरपरिस्थिती, वादळ, भूस्खलनामुळे हे वन्यप्राणी जंगल सोडून शहरी वस्तीत घुसत आहेत. यावेळी पावसापासून संरक्षण करण्यासाठी आडोसा शोधतात. पण यावेळी जंगली प्राणी माणसांच्या संपर्कात येण्यापासून टाळतात. पण जपानमध्ये झालेल्या मुसळधार पावसावेळी हरणांचा मोठा कळप आणि माणसं एका छताखाली आसरा घेताना दिसले, याचा व्हिडीओ देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांना देखील खूप भावला आहे. आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विट अकाउंटवरून हा मन प्रसन्न करणारा व्हिडीओ शेअर केला आहे. जो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा मनमोहक व्हिडीओ पाहून तुम्ही देखील आनंदी व्हाल यात शंका नाही.

आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, जपानमधील रस्त्यावर मुसळधार पाऊस बरसत असल्याचे दिसत आहे. यावेळी हरणाचा एक मोठा कळप पावसापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी एका मोठ्या शेडखाली उभा राहल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे माणसांच्या गर्दीतही ही हरणं अगदी आरामात शेडखाली उभी आहेत. हे दृश्य भारावून टाकणारे आहे. एक-दोन नव्हे, जंगली सिका हरणांचा संपूर्ण कळप या शेडखाली माणसांसोबत आसरा घेताना दिसला.

आनंद महिंद्रा यांनी हरणांचा हा मनमोहक व्हिडीओ शेअर करत लिहिले की, जपानमधील नारामधील सिका हरणांचा कळप वादळाच्या वेळी त्यांचा विश्वास असलेल्या माणा गर्दीत आसरा घेताना दिसला, मी हा व्हिडिओ नेहमी माझ्याकडे स्टोर करुन ठेवीन, जेणेकरून मला स्वतःला जग कसे असावे याची आठवण करुन द्यायची असेल तेव्हा तो पाहीन…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडिओ पाहून ट्विटर युजर्सनीही खूप सुंदर कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘हे खूप सुंदर दृश्य आहे.’ तर दुसऱ्या यूजरने हा असा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत. यावर तिसऱ्या यूजरने लिहिले की, ‘जगात लोक एकत्र राहू शकत नाहीत पण इथले दृश्य वेगळे आहे.