Anand Mahindra Tweet Video: महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असतात. वेगवेगळ्या जुगाडू व्हिडीओविषयी महिंद्रांना खास कुतूहल असते आणि अशाच नवनवीन अविष्कारांची माहिती ते आपल्या फॉलोवर्सपर्यंतही पोहोचवत असतात. आज सुद्धा महिंद्रांनी एक खास व्हिडीओ शेअर करून प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना हे समजावून सांगावं असे म्हटले आहे. एरवी, स्वतःच्या गाडीने किंवा ओला- उबर, टॅक्सीने प्रवास करताना बाहेरील निसर्गसौंदर्य पाहायचं असो किंवा रस्त्यावर, सिग्नलवर काही खरेदी करायचे असो आपण अनेकदा गाडीची काच वर खाली केली असेल. पण करता तेव्हा ती काच जाते कुठे याचा विचार केलाय का?

कारची काच ही दरवाज्याच्या वर असते, आणि दरवाजा अगोदरच इतका कमी जागेत बसवलेला असतो पण मग ही काच त्यात कशी जाते? शिवाय ती सुरक्षित कशी राहते? या सगळ्या मुद्द्यांचे उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हालाही समजेल. चला तर पाहूया…

Video: गाडीची काच खाली केल्यावर नेमकी कुठे जाते?

हे ही वाचा<< समोसा, पाणीपुरी, खिचडी, पराठासह ‘या’ १० पदार्थांची इंग्रजी नावे माहित आहेत का? मालपोह्याचा अर्थ वाचून व्हाल हैराण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गाडीच्या डिझाइननुसार कदाचित हे सिस्टीम बदलू शकते पण बहुतांश गाड्यांमध्ये हीच पद्धत फॉलो केली जाते. आनंद महिंद्रा यांचे हे ट्वीट अनेकांनी लाईक्स व रिशेअर केले आहे. तुम्हाला याविषयी माहित होते का? ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा.