भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या अनेक सोशल मीडिया पोस्ट केवळ प्रेरणादायीच नसतात तर त्यातून अनेकदा त्यातून सामाजिक संदेशही दिला जातो. यात कधी कधी ते जुगाडचेही अनेक व्हिडीओ शेअर करत असतात, जे युजर्सनाही खूप आवडतात. यात आनंद महिंद्रा यांनी एक नवीन पोस्ट केली आहे. याच आयसीसी क्रिकेट विश्वचषक’ सुरु होण्याआधी टीम इंडियाच्या जर्सीचा एक फोटो पोस्ट केला होता. जो सोशल मीडिया युजर्समध्ये चर्चेचा विषय बनला आहे. कारण आनंद महिंद्रा यांच्या या पोस्टमधये त्यांचे नाव असलेली ५५ नंबरची जर्सी दिसतेय. पण या जर्सीवर त्यांनी ५५ नंबरच का निवडला? असा सवाल आता युजर्स करत आहेत.
यावर काही युजर्सनी आनंद महिंद्रा आणि ५५ नंबरचे नेमके काय कनेक्शन आहे हे शोधून काढण्याचा प्रयत्न केला आहे. आनंद महिंद्रा यांनी आज ट्विटरवर टीम इंडियाच्या जर्सीचे दोन फोटो पोस्ट केले आहेत, यात जर्सीच्या मागे आनंद आणि ५५ नंबर लिहिला दिसतोय. तर कॅप्शनमध्ये आनंद महिंद्रा यांनी बीसीसीआयचे आभार मानत लिहिलेय की, मी तयार आहे… त्यांच्या या पोस्टवर आता अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
म्हणूनच महिंद्रांनी जर्सीसाठी निवडला ५५ नंबर
रोहित नावाच्या एका ट्विटर युजरने या जर्सीबद्दल उत्सुकता व्यक्त करत, आनंद महिंद्रा यांना प्रश्न विचारला की, जर्सीसाठी तुम्ही ५५ नंबरच का निवडला? ज्यावर आनंद महिंद्रांनी उत्तर देत लिहिले की, याचे योग्य उत्तर कोण देऊ शकते हे पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. नंतर काय अनेक युजर्स आपलं थोड डोक वापर कमेंट्समध्ये स्वत:च्या उत्तर लिहिलीत आहेत.
यात बहुतेक युजर्सनी म्हटले आहे की, तुमचा जन्म १९५५ मध्ये झाला म्हणून हा ५५ नंबर त्याचाच एक भाग आहे. तर एका व्यक्तीने आपल्या मेंदूचा अप्रतिम वापर करत लिहिले की, कोहली आणि आनंद या नावात पाच अक्षरं आहेत, त्यामुळे दोघांच्या अक्षरांचे ५ जोडून ५५ असे होते. पण यातील योग्य उत्तर काय आहे हे अद्याप समोर आलेले नाही, त्यामुळे महिंद्रा यांनी जर्सीसाठी ५५ नंबर का निवडला याचे खरे उत्तर तुम्हाला माहित असल्यास आम्हाला कमेंट करुन सांगा.