IPL 2024 Anand Mahindra Viral Tweet : सध्या देशात ‘इंडियन प्रीमियर लीग 2024’ (IPL 2024) ची क्रेझ पाहायला मिळतेय. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटी, बिझनेस मॅन आयपीएल सामन्यांचा आनंद घेताना दिसत आहेत. चाहते स्टेडियममध्ये सामना पाहण्याबरोबरच टीव्ही आणि स्मार्टफोनवरही मॅचचा आनंद लुटतायत. यात सुट्ट्यांच्या दिवशी जर मॅच असेल तर काहींचे घर म्हणजे क्रिकेटचे स्टेडियम असते. घरातील काही क्रिकेटप्रेमी मंडळी आणि त्यांचा मित्रपरिवार सामना संपेपर्यंत टीव्हीसमोरून हलत नाहीत. प्रत्येक चौकार, षटकारावर घरात कल्ला केला जातो. यातच भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे देखील क्रिकेटचे मोठे चाहते आहेत. आयपीएल सामन्यांसंदर्भात तेही सोशल मीडियावर अनेक पोस्ट करतात. यातच आनंद महिंद्रांनी आयपीएल पाहण्यासंदर्भात एक असा फोटो पोस्ट केलाय, जो पाहून तुम्हीदेखील पोट भरून हसल्याशिवाय राहणार नाही.

तुमच्यापैकी अनेक जण आरामात सोफ्यावर बसून आयपीएल सामना पाहण्याचा आनंद घेत असतील. टीव्हीसमोरील सोफ्यावर अगदी पाय मोकळे सोडून किंवा आरामशीर झोपून तुम्ही आयपीएल पाहत असाल, पण आनंद महिंद्रांनी आयपीएल पाहण्यासाठी म्हणून अशा एका सोफ्याचा फोटो पोस्ट केलाय, जो पाहून कोणालाही पटकन हसू येईल; कारण हा साधासुधा सोफा नाही.

आलिशान कुशनसह ठराविक फॅन्सी लेदरचा वगैरे असा हा सोफा असेल असे तुम्हाला वाटले असेल, पण हा साधा सुधा सोफा नाही. महिंद्रांनी फुगलेल्या गोरिल्लाच्या आकाराच्या सोफ्याचा फोटो शेअर केला आहे. तो इतका आलिशान, आरामदायी दिसतो की त्यात बसल्यानंतर कोणालाच उठण्याची इच्छा होणार नाही.

मानलं राव पठ्ठ्याला! म्हशींचं उन्हापासून संरक्षण करण्यासाठी चक्क गोठ्यात लावले एसी; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “अंबानी…”

महिंद्रांनी या गोरीला सोफ्याचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “मला हा संडे सोफा हवा आहे. #IPL सामने बसून पाहण्यासाठी तो एकदम परफेक्ट सोफा आहे.” दरम्यान, अनेकांनी त्यांच्या या मजेशीर पोस्टवर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

अनेक जण आनंद महिंद्रांच्या या पोस्टखाली वेगवेगळ्या डिझाइनच्या सोफ्यांचे फोटो पोस्ट करत मजेदार कमेंट्सदेखील करत आहेत. काहींनी या सोफ्यावर बसून टीव्ही पाहणे म्हणजे सुख असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी हा सोफा ठेवण्यासाठी मुंबईत २ बीएचके फ्लॅट तरी पाहिजे, असे मत मांडलेय. याशिवाय काही जण, रात्री मध्येच झोपेतून उठलो आणि सोफ्यावरील गोरीला दिसला तर? असे मिश्कील प्रश्न विचारत आहेत.

काही आठवड्यांपूर्वी आनंद महिंद्रा यांनी आयपीएलमधील धोनीच्या फलंदाजीचे तोंड भरन कौतुक केले होते. मुंबई इंडियन्सविरुद्ध चैन्नई सुपरकिंग्जच्या सामन्यात धोनीने अवघ्या ४ चेंडूत २० धावा करत संघाला २०६ धावांपर्यंत नेले. सीएसकेच्या धावांचा हा डोंगर पार करणे मुंबई इंडियन्स संघाला मात्र जड गेले. यामुळे सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला घरच्या मैदानावरच दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर आनंद महिंद्रा यांनी एक्सवर धोनीबद्दल एक पोस्ट केली, ज्यात त्यांनी लिहिले की, आज मी कृतज्ञ आहे की माझे नाव ‘माही-इंद्रा’ आहे.