बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खाननं ‘जवान’ चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. कोट्यावधी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या शाहरुखची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. लहान मुलांपासून ते अगदी अबालवृद्धापर्यंत शाहरुखचे चाहतावर्ग आहे. अशातच एका जबरा फॅनने शाहरुख खानचं जबरदस्त पोट्रेट बनवलं आहे. एसआरके लेटर्सचा वापर करून चाहत्याने शाहरुखचं सुंदर पोट्रेट बनवलं. शाहरुखच्या पोट्रेटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एक आर्टिस्ट जवान चित्रपटातील विक्रम राठोडचा पोट्रेट बनवताना दिसत आहे. शाहरुखने या चित्रपटात विक्रम राठोडची भूमिका साकारली आहे. हे पोट्रेट शाहरुखच्या नावाने तयार केलं आहे. त्यामुळे संपूर्ण बॉलिवूड विश्वात या पोट्रेटची चर्चा सुरु आहे. फिल्म स्टार्सचे पोट्रेट तुम्ही अनेकदा पाहिले असतील. मात्र, शाहरुखच्या एका चाहत्यानं बनवलेला फोटो पाहून सर्वच थक्क झाले आहेत. हा फोटो खूप सुंदर आणि अनोखा आहे. कारण या फोटोत रंग वापरले नाहीत, तर एसआरके लेटर्सचा वापर करुन हा फोटो बनवण्यात आला आहे.
इथे पाहा व्हिडीओ
@djmn_drawing नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शाहरुखच्या पोट्रेटचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला शाहरुख खान विक्रम राठोडच्या रुपात दिसतो. त्यानंतर या फोटोला झूम करून दाखवल्यावर हे पोट्रेट एसआरके लेटर्सचा वापर करून बनवल्याचं व्हिडीओत दिसत आहे. या पोट्रेटमध्ये असलेल्या रिकाम्या जागी ऑरेंज कलरच्या पेनने SRK लिहिण्यात आलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी जबरदस्त प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. अनेक नेटकऱ्यांनी आर्टिस्टच्या कलेचं कौतुक केलं आहे.