Viral Contract Marriage: आजकाल विवाहसोहळा हा पारंपारिक पद्धतींसोबतच लग्नात काही तरी हटके करण्याच्या वेगवेगळ्या प्रयत्नामुळे चर्चेत येत असतो. लग्नात गळ्यात हार घालताना नवरा-नवरीला उचलून घेण्यापासून ते एकमेकांच्या पायाला स्पर्श करण्यापर्यंत अशा अनेक विचित्र गोष्टी आता विवाहसोहळ्यात जोडू लागले आहेत. काही जोडपी सात फेरे घेऊन तर कुणी सप्तपदी घेऊन आयुष्यभर एकत्र राहण्याचे वचन घेत असतात. पण आसाममधील एका जोडप्याने त्यांच्या लग्नात अनोखी भर घालून नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. या जोडप्याने लग्नासाठी चक्क एक करारच करून घेतलाय. लग्नात नवरी या करारावर स्वाक्षरी करतानाचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. या करारामध्ये कोण-कोणत्या अटी लिहिल्या आहेत, जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आसाममधील शांती आणि मिंटू या जोडप्याने त्यांच्या लग्नात एक अनोखा करार केला आहे आणि त्यावर स्वाक्षरी सुद्धा केली आहे. या करारामध्ये कोणी काय करावे आणि काय करू नये हे लिखित यादीत सांगितले आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरीने लाल रंगाचा आकर्षक लेहेंगा परिधान केलेला आहे. ही नवरी तिच्या नवरदेवासोबत लग्नासाठी झालेल्या अनोख्या करारावर साक्षरी करताना दिसतेय. मोठ्या कार्डवर लिहिलेल्या या करारावर स्वाक्षरी करताना हे जोडपे खूप आनंदी दिसत आहेत. यावेळी व्हिडीओ कराराच्या अटी आणि शर्तींवर झूम इन होताना दिसून येत आहे. या अनोख्या करारामध्ये नवीन जोडप्याला भविष्यात आवश्यक असलेल्या अनेक तपशीलांचा समावेश आहे. लग्नानंतर कुणी काय करावं आणि काय करू नये हे या करारात लिहिलेलं आहे. जिममध्ये जाण्यापासून ते खरेदी करण्यापर्यंतच्या अनेक गोष्टींचा उल्लेख या करारामध्ये लिहिलेला आहे.

आणखी वाचा : ट्रकचा हॉर्न वाजताच रस्त्यावर लोळत नागिन डान्स करू लागले तरूण, VIRAL VIDEO पाहून पोट धरून हसाल

करारानुसार, “नवरीने रोज साडी घालावी.” असं या करारात म्हटलंय. तसंच प्रत्येक रविवारी सकाळचा नाश्ता तू करशील, असं देखील यात म्हटलंय. गंमत म्हणजे रविवार सोडला तर आठवड्यातील इतर दिवशी जेवण कोण बनवणार हे मात्र यात लिहिलं गेलं नाही. ‘घरच्या जेवणाला नेहमी हो म्हणायचं’ असं देखील या करारात लिहिलंय. आणखी कोणकोणत्या गोष्टी या करारात लिहिल्या आहेत, हे जाणून घेण्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ पाहाच.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : भर पावसात नाग नागिणीचा प्रणय, दीड तास सुरु होता रोमान्स

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : शेवटी आईचं काळीज! मुलाला वाचवण्यासाठी सुपरमॉम कारच्या हुडला चिटकून राहिली!

वेडलॉक फोटोग्राफी आसाम नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. लग्नातला हा अनोखा करार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय. हा व्हिडीओ लोकांना फार आवडू लागलाय. या व्हिडीओला आतापर्यंत ४० मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १.९ मिलियनपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक करत आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assam couple signs contract saying bride has to wear saree everyday viral video divides prp
First published on: 12-07-2022 at 15:43 IST