Viral Video: कुटुंब म्हटलं की प्रेम, भांडणं, राग या सर्व गोष्टी आल्याच; पण अनेकदा याच कुटुंबातील लोक कधी टोकाची भूमिका घेतील सांगता येत नाही. पैसा, प्रॉपर्टी किंवा एकमेकांची बरोबरी करण्यात अनेक कुटुंबीय स्वतःच्या कुटुंबातील लोकांच्या जीवावर उठतात. आपल्याच लोकांनी केलेली हत्या, अपहरण यांसारख्या अनेक गोष्टी आपण चित्रपट, मालिकांमध्ये पाहतोच; पण अशा घटना अनेकदा खऱ्या आयुष्यातही घडतात. या घटनेसंदर्भातील असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून तुमचाही थरकाप उडेल.

हा व्हायरल व्हिडीओ राजस्थानातील असून या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला तिच्या मुलाला घेऊन एका रुममध्ये येते. त्या रुममधील बेडवर एका लहान बाळाला झोपवण्यात आले होते. ती महिला सुरुवातीला काही वेळ शांत उभी राहते आणि थोड्यावेळाने बेडवर झोपलेल्या बाळाला काहीतरी पाजते, जे विष असल्याचा दावा करण्यात आला आहे. विष पाजल्यानंतर ती महिला त्या रुममधून तात्काळ निघून जाते. त्यानंतर या व्हिडीओमध्ये ते लहान बाळ काहीवेळ जोरात हालचाल करताना दिसत आहे; पण त्यानंतर अचानक त्याच्या हाता-पायाची हालचाल थांबते.

हा व्हायरल व्हिडीओ X(ट्विटर) वरील @NCMIndia Council For Men Affairs या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये, “राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील भद्रेस गावात मोठ्या भावाच्या पत्नीने तिच्या दीराच्या मुलाला विष दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. माहितीनुसार दीराची दोन मुले यापूर्वी अशाच परिस्थितीत मरण पावली होती आणि त्या मुलाच्या आईला तिच्या जावेवर संशय होता. त्यामुळे यावेळी तिने सतर्क राहून मुलाला झोपवलेल्या रुममध्ये कॅमेरा सुरू ठेवला आणि शेवटी घडायचं तेच घडलं. तिच्या मोठ्या जावेने रुममध्ये येऊन लहान मुलाला विष पाजले. पण, त्या बाळाचे नशीब बलवत्तर होते त्यामुळे त्याचा जीव वाचला. तीन दिवसांपासून या बालकाला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते आणि आता तो सुखरूप आहे. या घटनेसंदर्भात आम्ही गावकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र ते सर्व परस्परविरोधी गोष्टी सांगत आहेत. आम्ही सध्या त्या कुटुंबाशी बोलण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही त्यांच्याशी संवाद साधण्यात सक्षम झाल्यावर अपडेट करू”, असं लिहिण्यात आलं आहे.

हेही वाचा: निर्लज्जपणाचा कळस! रिल्ससाठी मरिन ड्राइव्हवर तरुणीचा अश्लील डान्स; Viral Video पाहून नेटकरी म्हणाले, “आता मुंबईतही घाण..”

पाहा व्हिडीओ:

या व्हिडीओला जवळपास दोन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून अनेक लोक यावर कमेंट्स करून संताप व्यक्त करताना दिसत आहेत. यावर युजरने लिहिलंय की, “किती घृणास्पद आहे, ती या निष्पाप जीवाला मारण्यास तयार आहे. या बाळाच्या आई-बाबांना त्यांच्या बाळाला वाचवण्यासाठी लवकरात लवकर अशा कुटुंबातून बाहेर पडावे लागेल!”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “किती राक्षसी वृत्तीची बाई आहे”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “हे एखाद्या चित्रपटातील कथेसारखं भयानक आहे.”