इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या काही गोष्टी सहज सिद्ध करतात की जर तुमचा तुमच्या स्वप्नांवर विश्वास असेल तर काहीही अशक्य नाही. आसाममधल्या माणसाची ही गोष्ट याचीच प्रचिती देते. हा अवलियाचे स्वप्न होतं टु व्हिलर खरेदी करण्याचे, त्यासाठी त्याने पैसेही जमा केले. पैसे घेऊन जेव्हा तो शोरुमध्ये पोहचला तेव्हा सर्वजण आश्चर्याने थक्क झाले. पुढे नक्की काय घडलं? चला जाणून घेऊ या.

९०,००० रुपयांची नाणी देऊन खरेदी केली टु व्हिलर

एएनआयने पोस्ट केलेला हा व्हिडिओ आहे आसाममधील दररंग जिल्ह्यातील सिपझार भागात राहणाऱ्या मोहम्मद सैदुल हक यांचा, ज्याने अनेक वर्ष कष्ट करुन पैसे साठवले होते. आपल्या कष्टाच्या पैशातून दुचाकी खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. पण टु व्हिलर खरेदी करण्यासाठी हा व्यक्ती चक्क पोतं भरुन नाणी घेऊन तो शो रुममध्ये पोहचला. आणि थोडी थोडकी नव्हे तर तो तब्बल ९०,००० रुपयांची नाणी घेऊन आला होता. आता एवढी नाणी मोजणार कोण असा प्रश्न नक्कीच उभा राहिला असणार? पण शोरुमच्या मालकाने मोहम्मद सैदुल हक याचे स्वागत केले आहे. हा सर्व प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर चर्चेत आहे.

हनी सिंगच्या गाण्यावर नव्हे, तर हनुमान चालिसामध्ये तरुणाई गुंग; भक्तीमय व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

शोरुमच्या कर्मचाऱ्यांनी मोजली सर्व नाणी
या व्हिडीओमध्ये दिसते आहे कि, मोहम्मद सैदुल हक नाण्यांनी भरलेले पोतं आपल्या पाठीवर घेऊन टु व्हिलर शोरुममध्ये जातो. शोरुमच्या कर्मचाऱ्यासमोर तो नाण्यांनी भरलेलं पोतं ठेवतो. त्यानंतर शोरुमचा कर्मचारी त्याला एक फॉर्म भरुण्यासाठी देतो. फॉर्म भरल्यानंतर मोहम्मद सैदुल हक आपले नाण्यांचे पोतं उघडतो आणि त्याच शोरुमच्या कर्मचाऱ्यांकडून ते मोजून घेतो. ही नाणी वेगवेगळ्या डब्यांमध्ये भरल्याचे दिसते.

टू व्हीलर शोरूमचे मालक रॉयल रायडर्स म्हणाले, “जेव्हा माझ्या कर्मचाऱ्याने मला सांगितले की, एक ग्राहक आमच्या शोरूममध्ये 90,000 रुपयांची नाणी घेऊन स्कूटर खरेदी करण्यासाठी आला आहे, तेव्हा मला आनंद झाला कारण मी टीव्हीवर अशा बातम्या पाहिल्या होत्या. भविष्यातही त्याने चारचाकी खरेदी करावी अशी माझी इच्छा आहे.”

मीम्स क्रिएटर्स म्हणून जॉब करायचाय? मग भारतातील ‘ही’ कंपनी देतेय दरमहा १ लाख पगार आणि…

टु व्हिलर घेण्याचे स्वप्न झालं पूर्ण
टु व्हिलर खरेदी केल्यानंतर मोहम्मद सैदुल हक म्हणाले, “मी बोरागाव परिसरात एक छोटेसे दुकान चालवतो आणि टु व्हिलर घेणे हे माझे स्वप्न होते. मी ५-६ वर्षांपूर्वी नाणी गोळा करायला सुरुवात केली. अखेर मी माझे स्वप्न पूर्ण केले आहे. मी आता खरोखर आनंदी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडिओने अनेक लोकांना आवडला. अनेकांनी या व्यक्तीचे कौतुक केले आणि तो लवकरच कार खरेदी करू शकेल अशी इच्छा व्यक्त केली.