या काकू व्हिडीओमध्ये अप्रतिम डान्स करताना दिसत आहेत. मंजुला वर्मा नावाच्या इन्स्टाग्राम यूजरने हा व्हिडीओ आपल्या अकाउंटवर शेअर केला आहे.

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात, तर काही थक्क करणारे असतात. असाच एक हटके व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ एका ‘घूँघट’ घेणाऱ्या साडीवाल्या काकूंचा आहे. या काकू ‘घूँघट’ घेऊन डान्स करताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत.

हेही वाचा : रोजंदारी करणारा मजूर एका रात्रीत १०० कोटींचा मालक बनला तरी कसा? आता मागे लागला पोलिसांचा ससेमिरा कारण…

सोशल मीडियावर आणि विशेषत: इन्स्टाग्रामवर रिल्स खूप लवकर व्हायरल होतात. एका साडीवाल्या काकूंचे एक रिल सध्या व्हायरल होत आहे. या काकू व्हिडीओमध्ये अप्रतिम डान्स करताना दिसत आहेत. मंजुला वर्मा नावाच्या इन्स्टाग्राम यूजरने हा व्हिडीओ आपल्या अकाउंटवर शेअर केला आहे.

काकूंच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडलाय. नेटकरी त्यांच्या डान्सकौशल्याचे कौतुक करत आहेत. या व्हिडीओला भरपूर व्ह्यूज आले असून अनेक लाइक्स मिळाले आहेत.

हेही वाचा : रस्त्यावर आंबे विकण्यासाठी लहान मुलाने केला अनोखा जुगाड, व्हायरल Video पाहून तुम्हीही कौतुक कराल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अकाउंटवर तुम्हाला काकूंचे अनेक व्हिडीओ दिसतील. त्यांनी वेगवेगळ्या गाण्यांवर डान्स केले आहेत. सोशल मीडियावर असे अनेक यूजर्स असतात जे डान्स, गायन, कॉमेडी, मोटिव्हेशनल व्हिडीओ बनवून त्यांच्या कला दाखवतात.