कोणाचे नशीब कधी उघडेल हे काही सांगता येत नाही. शिवाय सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात अनेक लोक रात्रीत करोडपती झाल्याच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या आहेत. सध्या असाच एक व्यक्ती करोडपती झाला आहे. पण त्याचं नशीब बदलायला त्याच्या बायकोचा राग कारणीभूत ठरला आहे.

हे वाचून कदाचित तुम्हाला आश्यर्य वाटेल, पण हे खरं आहे. कारण, ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीने आपल्या रागवलेल्या पत्नीला शांत करण्यासाठी एकाच नंबरची २ लॉटरीची तिकिटे खरेदी केली होती. ज्यामुळे त्याने २ मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे १० कोटी ७६ लाख १५ हजार हजार रुपयांचा जॅकपॉट जिंकला आहे. महत्वाची बाब म्हणजे या व्यक्तीची पत्नी मागील ३० वर्षांपासून त्याच नंबरची लॉटरी घेत होती, मात्र यापुर्वी ती एकदाही लॉटरी जिंकली नव्हती.

हेही पाहा- पायलट्सनी चक्क विमानात साजरी केली होळी; प्रवाशांच्या जीवाशी खेळ, कॉकपीटमधील फोटो Viral होताच कंपनीकडून कारवाई

लॉटरीचे तिकीट काढलं अन् बायकोला आला राग –

News.com.au च्या रिपोर्टनुसार, या व्यक्तीने आठवड्यापूर्वी एक लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. पण लॉटरीचे तिकीट खरेदी करताना त्याने पत्नीच्या आवडीचा क्रमांक टाकण्याऐवजी स्वत:च्या आवडीचा क्रमांक ड्रॉ मध्ये टाकला. ज्यामुळे पत्नीला राग आला आणि पत्नीचे मन वळवण्यासाठी आणि तिचा राग घालवण्यासाठी पुढच्याच आठवड्यात त्याने एका ऐवजी दोन लॉटरीची तिकिटे खरेदी केली. शिवाय त्या दोन्ही तिकीटावर एकच क्रमांक टाकून ती ड्रॉ मध्ये जमा केली. या दोन तिकीटांमुळे त्याचे नशीब पालटले आणि तो रात्रीत करोडपती झाला. सोमवारी लॉटरी व्यवस्थापनाने या नवरा बायकोला २ दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्स दिले.

हेही पाहा- वंदे भारत एक्सप्रेस उंच घाटात पोहोचताच…, महिला लोको पायलट सुरेखा यादव यांचा ट्रेन चालवतानाचा थरारक Video पाहाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लॉटरी जिंकलेल्या व्यक्तीच्या मते, त्याची पत्नी गेल्या ३० वर्षांपासून एकाच नंबरची लॉटरी खेळत आहे. प्रत्येक वेळी ती लॉटरी लागावी अशी देवाकडे प्रार्थना करायची, पण तिचे नशीब साथ देत नव्हते. अखेर आता तिची मेहनत फळाला आली. तो पुढे म्हणाला की, मी माझ्या पत्नीला २ लॉटरीची तिकिटे खरेदी केल्याचं सांगितलं नव्हतं. जेव्हा तिने जॅकपॉट जिंकला तेव्हा ती १ लाख डॉलर जिंकंले म्हणून आनंदात असतानाच मी तिला दुसऱ्या तिकिटाबद्दल सांगितले तेव्हा तिच्या आनंदाला पारावारच उरला नाही. तर लॉटरीच्या पैशांनी मुलांचे भविष्य सुधारण्यासाठी खर्च करण्यासह त्या पैशातून घर खरेदी करण्याचं नियोजनही या दाम्पत्याने केलं आहे.