Viral Video: रेल्वेस्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर अनेकदा नकोसे अपघात घडतात. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर अतिरिक्त दक्षता घेतली जाते. पण मुंबईतील कुर्ला रेल्वे स्थानकावरून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक चालक ऑटोरिक्षा घेऊन ट्रॅकच्या शेजारी प्लॅटफॉर्मवर ती चालवताना दिसत आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर रिक्षा आल्याच पाहून तिथे उपस्थित प्रवासीही गोंधळून गेले. त्यानंतर प्रवाशांनी आरडाओरड करत रिक्षाचालकाला रिक्षा प्लॅटफॉर्मवरून बाहेर काढायला लावली. हा व्हिडिओ व्हायरल होताच एकच खळबळ उडाली आहे.

रिक्षा घेऊन थेट पोहोचला प्लॅटफॉर्मवर..

ही घटना १२ ऑक्टोबरची सांगण्यात येत असून, एका यूजरने ट्विटरवर पोस्ट केल्यावर ही बातमी समोर आली आहे. त्यांनी रेल्वे मंत्रालय आणि आरपीएफच्या अधिकृत ट्विटर हँडललाही टॅग केले. या ट्विटला उत्तर देताना आरपीएफच्या मुंबई विभाग कार्यालयाने यावर प्रतिक्रिया दिली आणि ही घटना केव्हा आणि कशी घडली हे सांगितले. याशिवाय यावर काय कारवाई करण्यात आली याचीही माहिती दिली आहे.

( हे ही वाचा: Viral Video: भल्यामोठ्या अजगराला कोंबडीची हाव नडली… क्षणात झाला बंदिस्त; नेमकं काय घडलं पाहा)

येथे पाहा व्हिडीओ

( हे ही वाचा: CCTV: चक्क पोलीसानेच केली चोरी! बंद दुकानाबाहेरील बल्ब चोरल्याच्या घटनेने उडाली खळबळ; पाहा Viral Video)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिक्षा जप्त करून चालकाला अटक

या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आल्याचे आरपीएफकडून सांगण्यात आले आहे. हा व्हिडीओ १२ ऑक्टोबरचा असून पहाटे १ वाजेच्या सुमारास पश्चिम दिशेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर अचानक एक रिक्षा घुसली. त्यानंतर पोलिसांनी प्लॅटफॉर्मवरून रिक्षा बाहेर काढली आणि संबंधित अधिकाऱ्यांनी रिक्षा ताब्यात घेऊन ऑटोचालकास पकडले आणि त्याला आरपीएफ चौकी कुर्ला येथे आणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच चालकाला सीएसएमटी न्यायालयात हजर करून शिक्षाही झाल्याचे सांगण्यात आले आहे.