हल्ली फेमस होण्यासाठी कधी कोण काय करेल याचा नेम नाही. यात अनेक केक, बेकरी शॉप किंवा अनेक शॉप मालक ग्राहकांसाठी खास ऑफर ठेवतात. दसरा, दिवाळी असे सण लक्षात घेत या ऑफर्स ठेवल्या जातात. पण परदेशात अनेकदा काही हटके पद्धतीने ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित केले जाते. अशाच प्रकारचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एक बेकरी मालकाने आपल्या ग्राहकांना एक मजेशीर ऑफर दिली आहे. जी वाचून शॉपच्या डोरवरुन ग्राहक हसत भन्नाट डान्स करत एन्ट्री घेत आहे. ज्याबदल्यात ग्राहकांना बेकरी शॉप मोफत चिप्स पॅकेट देत आहे.

बेकरी मालकाने ठेवलेली ऑफर ग्राहकांनीही खूप आवडली आहे. ज्यामुळे ग्राहक ती ऑफर सीरिअसली घेत बेकरी शॉपमध्ये जाऊन खरेदीचा आनंद घेत आहे. ही ऑफर अशी आहे की, ग्राहकाने जरा हटके पद्धतीने डान्स करत शॉपमध्ये एन्ट्री घ्यायची आहे, यावेळी ज्या ग्राहकाचा डान्स बेकरी शॉपला आवडेल त्याला मोफत चिप्स पॅकेट मिळेल. मग काय ही ऑफर वाचून ग्राहकांनीही खरेदीसाठी गर्दी करत खरेदीची मज्जी लुटली.

डेरिंगबाज चिमुकला! घरात पूजापाठ सुरु असताना सापाला दोरीप्रमाणे आणलं ओढत अन्….; VIRAL VIDEO पाहून भरेल धडकी

ग्राहकांची नाचत बेकरी शॉपमध्ये भन्नाट एन्ट्री

हे मजेशीर प्रकरण इंग्लंडमधील डॅलेट शहरातील बॅगेल्स अँड श्मीअर नावाच्या बेकरी शॉपमधील आहे. यावेळी बेकरी शॉपने ठेवलेली ऑफर वाचून ग्राहक जर हटके, वेडा वाकडा डान्स करत शॉपमध्ये येऊ लागले, यावेळी शॉपनेही त्यांना आवडलेल्या डान्ससाठी फ्रीमध्ये चिप्स देण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे भन्नाट डान्स करत शॉपमध्ये येणाऱ्या ग्राहकांची गर्दी झाली. बेकरी मालकालाची ही आयडिया जबरदस्त असल्याने ती खूप यशस्वी झाली, याचा व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर खूप व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इन्स्टाग्रामवर bagelsandschmear नावाच्या अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. यावर एका युजरने लिहिले की, असेच मार्केटिंग केले जाते. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, यामुळे लोकांना एक वेगळाच आनंद मिळाला, बेकर्स शॉपचे आभार. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.