scorecardresearch

५०० रुपये द्या, जेलमध्ये राहा! कुंडलीतील ‘बंधन योग’ हटवण्यासाठी तुरुंगात सुरु झाली भन्नाट योजना

Kundli Dosh And Bandhan Yog: तुमच्या ग्रहांची स्थिती बिघडल्याने जर तुमच्या ज्योतिषाने सांगितले की तुम्ही आता जेलमध्ये जाणार आहात तर.. कोणालाही धडकी भरू शकते हो ना?

५०० रुपये द्या, जेलमध्ये राहा! कुंडलीतील ‘बंधन योग’ हटवण्यासाठी तुरुंगात सुरु झाली भन्नाट योजना
प्रतिनिधिक छायाचित्र

Kundli Dosh And Bandhan Yog: तुमच्या ग्रहांची स्थिती बिघडल्याने जर तुमच्या ज्योतिषाने सांगितले की तुम्ही आता जेलमध्ये जाणार आहात तर.. कोणालाही धडकी भरू शकते हो ना? पण अलीकडे व्हायरल होणाऱ्या का वृत्तानुसार एका तुरुंगात चक्क तुमच्या ग्रहांची बिघडलेली दशा बदलून देण्याचा दावा केला जात आहे. ५०० रुपये भरून तुम्ही एक रात्र तुरुंगात राहायचे आणि ग्रहांच्या वक्रीने, संक्रमणाने बिघडलेले नशिबाचे योग सुधारून घ्यायचे असे हे पॅकेज सध्या चर्चेत आहे. नेमकं हे प्रकरण आहे काय आणि तुरुंगात राहून सुटणारा हा बंधन योग नेमका काय असतो हे आता आपण जाणून घेऊयात..

उत्तराखंडच्या हल्दवानी येथील तुरुंग प्रशासनाने लोकांना “वाईट कर्म” टाळण्यासाठी एक अनोखी कल्पना आणली आहे तुरुंगात प्रति रात्र 500 रुपये इतके शुल्क भरून आपल्याला तुरुंगात कायद्याप्रमाणे एक रात्र राहण्याची सोय केली जाते. 1903 मध्ये बांधलेल्या हल्दवानी तुरुंगात सहा कर्मचारी निवासस्थानांसह जुन्या शस्त्रागाराचा एक भाग आहे. सध्या तुरुंगात पाहुण्यांच्या आगमनाची तयारी करण्यात आली आहे.

कारागृहाचे उप तुरुंग अधीक्षक सतीश सुखीजा यांनी TOI ला सांगितले की, ” काहींना कुतुहूल म्हणून तुरुंगाला भेट द्यायची असते, मागील काही महिन्यात वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ‘शिफारस केलेल्या व्यक्तींना’ तुरुंगात काही तास घालवण्याची मुभा दिली जात होती. या ‘पर्यटक कैद्यांना’ तुरुंगातील गणवेश आणि तुरुंगाच्या स्वयंपाकघरात बनवलेले जेवण दिले जाते.

जेलमध्ये रात्र घालवण्याच्या या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील अनेकांना त्यांच्या ज्योतिषांनी कुंडलीतील बंधन योग टाळण्यासाठी हा सल्ला दिल्याचे सांगितले जाते. तर काहींनी पर्यटक म्हणून तुरुंगाला भेट देण्याची इच्छा असते. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या दोन्ही प्रकारच्या व्यक्तींसाठी तुरुंगात जागा तयार करण्यात आली आहे.

Video: जेव्हा सुंदर तरुणी रस्त्यातच भांडू लागल्या; एकीने तर केस खेचून जे केलं.. बघ्यांची गर्दी चक्रावुन गेली

आता बंधन योग म्हणजे नेमकं काय तर, ज्यांच्या कुंडलीतील ग्रहस्थिती चुकीच्या असतात त्यांना या बंधन योगाचे दोष अनुभवावे लागतात. ज्योतिषांच्या मते या व्यक्तींच्या आयुष्यात तुरुंगवास अपरिहार्य असतो. अशा व्यक्तींनी पुढे संकटात अडकण्यापेक्षा त्यांना हा सोयी सुविधांनी युक्त तुरुंगवास भोगण्याचा सल्ला दिला जातो.

याबाबत ज्योतिषी मृत्युंजय ओझा सांगतात की, “जेव्हा शनि आणि मंगळासह तीन ग्रह त्रिकोण करून एखाद्याच्या कुंडलीत किंवा जन्मपत्रिकेत प्रतिकूल स्थितीत विराजमान होतात, तेव्हा त्या व्यक्तीला तुरुंगवास भोगावा लागू शकतो. अशा परिस्थितीत, आम्ही सामान्यत: व्यक्तीला एक रात्र तुरुंगात घालवण्याचा सल्ला देतो आणि कैद्यांना जेवण पुरवतो जेणेकरून ग्रहांच्या स्थितीचे वाईट परिणाम टाळता येतील.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या