Viral Video : आयुष्य खूप सुंदर आहे, ते जगता आलं पाहिजे. संघर्ष कुणाला चुकलेला नाही. सर्वांशी प्रेमाने वागणे, गरजूंना मदत करणे, माणुसकीने वागणं ही मानवी मुल्ये प्रत्येक व्यक्तीने आत्मसात करणे आवश्यक आहे. अनेकदा आपल्या आजूबाजूला असे लोक दिसतात. जे दु:खात असतात तर कधी अडचणीत असतात. कधी परिस्थितीशी लढताना दिसतात तर कधी परिस्थितीसमोर रडताना दिसतात. अशा लोकांना आधाराची किंवा मदतीची गरज असते. त्यांना जर आपण थोडी जरी मदत केली तरी त्यांचे आयुष्य सुखी होऊ शकते.
सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भर पावसात एक महिला भाजीपाला विक्री करताना दिसत आहे. ती कोथिंबीर आणि फ्लॉवरची विक्री करत आहे. तिच्याकडे छत्री नाही त्यामुळे ती ओली चिंब भिजलेली आहे तरी सुद्धा ती भर पावसात भाजीपाला विकत आहे. तिचा हा संघर्ष पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल एक व्यक्ती तिच्याकडे येतो पण कोथिंबीर खरेदी करत नाही. तेव्हा निराश होते. पण त्यानंतर आणखी एक तरुण तिच्याकडे येतो आणि तिच्याकडून संपूर्ण भाजीपाला खरेदी करतो आणि तिला पैसे देतो. हे पाहून ती खूप खूश होते. तिचा आनंद गगनात मावेनासा असतो. त्यानंतर हा तरुण खरेदी केलेली कोथिंबीर आणि फ्लॉवर गाईला चारतो. महिलेची मदत करत तो पुण्य कमावतो पण त्याबरोबर गाईला भाजीपाला खाऊ घालत तो आणखी पुण्य कमावतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी पैसा नाही तर माणुसकी पाहिजे, हे या व्हिडीओतून शिकायला मिळतं.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
iamhussainmansuri या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कोणाच्या तरी हसण्याचे कारण बना”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, ” तुम्ही तिला रोज मदत करू शकणार नाही पण ती हा दिवस आयुष्यात कधीही विसरणार नाही.” तर एका युजरने लिहिलेय, “तू देवाचा माणूस आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “आम्हाला तुमचा अभिमान वाटतो” आणखी एका युजरने लिहिलेय, “जगात एकच धर्म आहे – माणुसकी” एक युजर लिहितो, “यालाच माणुसकी म्हणतात” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. साडेतीन लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे.