आजचा काळ हा सोशल मीडियाचा आहे. सोशल मीडिया हा काही फक्त मनोरंजनाचे साधन राहिला नाही तर उत्पन्नाचे साधनही झाला आहे. आजच्या काळात पैसै कमण्यासाठी लोक सोशल मीडियाचा वापर करतात. सोशल मीडियाद्वारे पैसे कमावण्यासाठी, भरपूर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करताना दिसतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ अनेकदा धक्कादायक आणि चक्रावून टाकणारे असतात. सोशल मीडियावर अनेकदा चुकीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात पण काही जणांसाठी हा पैसे कमावण्याचा मार्ग असतो. सध्या अशाच अशाच प्रकारे पैसे कमावणारा युट्युबर चर्चेत आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लखनऊमध्ये एक असे ठिकाणी आहे जिथे नेहमी अपघात होत असतात. या ठिकाणी होत असलेल्या अपघातांचे सीसीटिव्ही फुटेज शेअर करून एक युट्यूबर पैसै कमावत आहे. हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. कारण आपण सोशल मीडियावर रोज कित्येक अपघाताचे व्हिडीओ पाहत असतो. हे व्हिडीओ पाहताना तुम्ही कधी विचारही केला नसेल की,असे व्हिडीओ पोस्ट करून कोणी पैसा कमावू शकतो.

हेही वाचा – हेल्मेट घालून, म्हशीवर बसून ऐटीत रस्त्यावर फिरतोय हा तरुण; व्हायरल व्हिडीओ पाहून लोकांना आवरेना हसू

अलीकडेच, एक्स(ट्विटर) वर @3rdEyeDude नावाच्या अकांउटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. हा व्हिडीओ एका YouTube चॅनेलवर शेअर केल्या जाणाऱ्या अपघातांच्या व्हिडीओची छोटी झलक आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेत आला आहे. कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “सीसीटीव्हीच्या मालकाने आपल्या संपूर्ण YouTube चॅनेलवर लखनऊमध्ये एका ठिकाणी होणाऱ्या अपघातांचे फक्त सीसीटीव्ही फुटेज शेअर करून कमाई केली आहे. तो या ठिकाणाला “बरम्युडा ट्रँगल” असे म्हणतो आणि ते पूर्णपणे अर्थपूर्ण आहे.”

ज्याला लखनऊमध्ये असे एक विचित्र ठिकाण आहे जिथे नेहमी अपघात होत असतात त्याला ‘बर्म्युडा ट्रँगल’ असे नाव या युट्यूबरने दिले आहे. बर्म्युडा ट्रँगल हे पश्चिम उत्तर अटलांटिक महासागरातील असे रहस्यमयी ठिकाण आहे जिथे असंख्य विमाने आणि जहाजे गूढपणे गायब झाल्याच्या बातम्यांसाठी प्रसिद्ध आहेत. अशा लखनऊमधील हे ठिकाणही असेच आहे जिथे नेहमी अपघात होत असतात पण असे का होते याचे रहस्य मात्र उलघडलेले नाही. म्हणूनच कदाचित युट्युबरने या ठिकाणाला ‘बर्म्युडा ट्रँगल असे नाव दिले असावे.

हेही वाचा – “हा कसा रावण आहे, भाऊ!” बाईकवरुन केली एँट्री आणि स्टेजवर येताच नाचू लागला; व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

सोशल मीडियावर हे ट्विट तुफान व्हायरल झाले आहे आणि अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहे. एकाने म्हटले की, “याला म्हणतात संधीचे सोने करणे” तर दुसऱ्याने म्हटले की, “युट्युब मॉनेटायझेनश १०१!”

ज्या युट्यब चॅनलबाबत ही चर्चा सुरु त्यांचे नाव @ModBiz असे आहे. हे चॅनल अपघाताच्या व्हिडीओंनी भरलेले आहे. व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येते की या सीसीटिव्हीत्या अगदी समोर एक यु-टर्न आहे जिथे अनेक वाहनांची धडक होते. गेल्या पाच वर्षांपासून मागच्या चार पहिल्यांपूर्वीपर्यंत या ठिकाणी झालेल्या अपघातांचे व्हिडिओ येथे आहेत. हे व्हिडीओ पाहून लोकांना धक्का बसला आहे. काही लोकांची निष्काळजीपणे वाहन चालवतात हेही व्हिडीओतून दिसते. कोणताही गंभीर अपघाताचे व्हिडोओ येथे नाहीत हे लक्षात घेण्यासारखे आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की‘बर्म्युडा ट्रँगल’सारखेच या ठिकाणी अपघात होण्यामागचे कारण काय आहे हेही एक रहस्यच आहे. काही लोक हे ठिकाण लखनऊमधील जानकीपुरम असल्याचा दावा करत आहे पण अद्याप खात्रीपूर्वक माहिती मिळालेली नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bermuda triangle in lucknow how this youtuber earns by sharing accident videos from one spot snk
First published on: 26-10-2023 at 19:29 IST