रणरणतं ऊन, अंगातून नुसत्या घामाच्या धारा वाहतायत अशा उन्हाळ्यात कोण अंगावरून जाड गोधडी ओढून घराबाहेर पडतं? खरं तर असं करणं म्हणजे निव्वळ मुर्खपणा. पण, हरियाणामधले वयस्क सिताराम मात्र चक्क उन्हाळ्यात अंगावर जाड गोधडी, कानटोपी घालून घराबाहेर पडतात. बाहेर सूर्य आग ओकत असताना ते मात्र अंगणात शेकोटी पेटवून ऊब घेतात त्यांचं हे जगावेगळं वागणं एव्हाना गावकऱ्यांना चांगलंच परिचयाचं झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिताराम हे हरियाणामधल्या देरोली गावात राहतात. कडाक्याची थंडी गावात पडली की गावकरी घराबाहेर पडत नाही, ऊबदार कपडे परिधान करून ते घरात थांबतात पण सिताराम मात्र सुती कपडे घालून आरामात फिरतात कारण त्यांना थंडीत गरम होतं. जगाच्या अगदी उलट वागण्याच्या सवयीमुळे ते आजूबाजूच्या गावातही चांगलेच परिचयाचे झाले आहे.

सिताराम हे अगदी लहानपणापासूनच असे वागत असल्याचं काही गावकऱ्यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितलं. यामागचं कारण मात्र अद्यापही कोणाला कळलेलं नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bizarre haryana man feels cold in summers
First published on: 15-06-2018 at 15:36 IST