BJP Kit Gold Biscuit: भाजपच्या किटमध्ये मुंबईत सोन्याची बिस्किटे सापडली असे सांगत एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. घाटकोपर १७० मतदार संघात बूथ मटेरियल मध्ये सोन्याची बिस्कीट सापडले असाही दावा या व्हिडीओसह करण्यात येत आहे. दरम्यान, न्यूजचेकरने यासंदर्भात केलेल्या तपासात मूळ घटना समोर आली आहे. नेमकं हे प्रकरण काय व नक्की भाजपाच्या किटमध्ये काय आढळून आलं याविषयी सविस्तर जाणून घेऊया..

काय होत आहे व्हायरल?

https://x.com/BBakhschi/status/1789979466401218760

तपास:

व्हायरल दाव्याचा तपास करण्यासाठी आम्ही संबंधित व्हायरल व्हिडीओ बारकाईने बघितला. दरम्यान व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी आम्ही गूगलवर रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिला. मात्र व्हिडीओचा मूळ स्रोत किंवा त्याची अधिकृत सूत्राद्वारे असलेली माहिती उपलब्ध झाली नाही.

Sanjay Raut on Dawood Ibrahim fact check video
संजय राऊतांनी दिले दाऊद इब्राहिमला क्लीन चिट देण्याचे आश्वासन? Viral Video मुळे राजकीय वर्तुळात खळबळ; वाचा सत्य घटना
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
terror of gangster Mangalwar Peth , Mangalwar Peth,
पुणे : तडीपार गुंडाची कोयते उगारून दहशत, मंगळवार पेठेतील घटना
nana suryavanshi bjp
“त्यांना सांगा, आपली मैत्री आता २० तारखेनंतरच”, भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी भर सभेत केली शिवसैनिकांची कानउघाडणी
chhagan bhujbal on manoj jarange decision to not contest maharashtra assembly election spb 94
मनोज जरांगेंची विधानसभा निवडणुकीतून माघार; छगन भुजबळ म्हणाले, “हा निर्णय म्हणजे…”
amol mitkari jitendra awhad
“मुंब्र्यात जाऊन जितेंद्र आव्हाडांना…”, मिटकरींचं आव्हान; अजित पवारांवरील टीकेनंतर संताप व्यक्त करत म्हणाले…
maharashtra assembly election
“लोकसभेला साहेबांना खूश केलं, आता विधानसभेला मला खूश करा”; अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन!
arvind sawant
“तेव्हा मी त्यांची लाडकी बहीण होती, पण आता…”; ‘त्या’ विधानावरून शायना एनसींचं अरविंद सावतांवर टीकास्र!

दरम्यान आम्ही संबंधित किवर्डसच्या माध्यमातून गूगलवर शोधले. आम्हाला यासंदर्भात काही न्यूज रिपोर्ट्स मिळाले.

https://www.ndtv.com/india-news/perfume-bottles-not-gold-biscuits-bjp-leader-clarifies-on-viral-video-5641248
https://www.lokmat.com/crime/rumors-of-finding-gold-biscuits-in-ghatkopar-the-propaganda-material-has-finally-come-out-a-a457-c747/
https://mumbaipress.com/2024/05/11/rumors-of-finding-gold-biscuits-in-ghatkopar-the-propaganda-material-is-finally-out/

त्यापैकी पहिला रिपोर्ट होता NDTV चा. ११ मे २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या या रिपोर्टमध्ये या घटनेसंदर्भात भाजपचे मुंबई नॉर्थ सेंट्रल जिल्हा उपाध्यक्ष अजय बडगुजर यांनी दिलेली माहिती आहे. त्यांनी घटनेसंदर्भात स्पष्टीकरण देताना आपल्याला संबंधित पथकाने अडवून कसा त्रास दिला, सोन्याच्या बिस्किटासाठी कसा तपास झाला आणि शेवटी परफ्युमची प्लॅस्टिकची बाटली कशी सापडली, याची माहिती दिली. संबंधित रिपोर्टमध्ये याबाबतचा व्हिडीओ रिपोर्टसुद्धा आम्हाला पाहायला मिळाला.

https://www.ndtv.com/india-news/perfume-bottles-not-gold-biscuits-bjp-leader-clarifies-on-viral-video-5641248

आणखी तपास करताना आम्हाला, lokmat.com ने ११ मे २०२४ रोजी याच संदर्भात प्रसिद्ध केलेली बातमी सापडली. “घाटकोपरमध्ये सोन्याच्या बिस्किटांची अफवाच निघाली आणि प्रचाराचे साहित्य सापडले.” असे या बातमीत म्हटले आहे. या बातमीत मुंबईचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी तपासाअंती सोन्याची बिस्किटे नव्हे तर प्रचाराचे साहित्य मिळाल्याचे म्हटले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

https://www.lokmat.com/crime/rumors-of-finding-gold-biscuits-in-ghatkopar-the-propaganda-material-has-finally-come-out-a-a457-c747/

आणखी तपास करताना आम्हाला mumbaipress.com ने ११ मे २०२४ रोजी प्रसिद्ध केलेली बातमी सापडली. तेथेही पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांचा हवाला देऊन तपासादरम्यान सोन्याची बिस्किटे आहेत असे आवाज ऐकायला आले असले तरी अखेरीस प्रचाराचे साहित्य सापडल्याचेच म्हटले आहे.

https://mumbaipress.com/2024/05/11/rumors-of-finding-gold-biscuits-in-ghatkopar-the-propaganda-material-is-finally-out/

गाडीत सोन्याची बिस्किटे असल्याच्या संशयावरून भाजपचे मुंबई नॉर्थ सेंट्रल जिल्हा उपाध्यक्ष अजय बडगुजर यांना पोलीस स्थानकात नेऊन तपास करण्यात आला. आणि एकंदर प्रकार घडल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले. दरम्यान आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी बोलताना,” दिनांक ९ मे रोजी कुटुंबासमवेत जात असताना आपल्याला संशयाने अडवून घाटकोपरच्या चिरागनगर पोलीस स्थानकात नेण्यात आले. आपल्याला बराच वेळ थांबवून ठेवण्यात आले. मात्र आपल्या गाडीत प्रचाराचे साहित्य असल्याचे आणि सोन्याचे बिस्कीट ही अफवा असल्याचे स्पष्ट होताच सोडून देण्यात आले. मध्यरात्रीपर्यंत आपल्याला आणि कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागला. व्हिडीओ प्रसारित करणाऱ्यांनी अजूनही चुकीची अफवा पसरविणे सुरूच ठेवले आहे.” अशी माहिती दिली.

दरम्यान आम्ही चिरागनगर पोलीस स्थानकाशीही संपर्क साधला. “सोन्याची बिस्किटे सापडल्याची कोणतीही फिर्याद नोंद झालेली नाही. त्यादिवशीचा प्रकार हा निवडणूक पथकाचा नियमित तपासाचा भाग होता. त्यात सोन्याची बिस्किटे सापडली नाहीत.” असे सांगण्यात आले.

हे ही वाचा<< “मोदीच पंतप्रधान..”, म्हणत राहुल गांधींची शरणागती? स्वतः Video शेअर करत म्हणाले, “काही फरक पडणार नाही, देशात..”

निष्कर्ष: अशाप्रकारे तपासात भाजपच्या किटमध्ये मुंबईत सोन्याची बिस्किटे सापडली हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान मुंबईच्या घाटकोपर भागात संशयावरून तपासणी करण्यात आलेल्या भाजपच्या किटमध्ये प्रचाराचे साहित्य आणि परफ्यूमच्या प्लास्टिक बॉटल होत्या असे तपासात उघड झाले आहे.

अनुवाद: अंकिता देशकर

(ही कथा मूळतः न्यूजचेकर ने प्रकाशित केली होती आणि शक्ती कलेक्टिव्हचा एक भाग म्हणून लोकसत्ता ने पुनर्प्रकाशित केली आहे.)