आषाढी वारी म्हटलं की हातात टाळ घेऊन हरिनामाच्या जल्लोषात मग्न झालेले वारकरी पटकन डोळ्यासमोर येतात. दरवर्षी देहू येथून तुकोबांची आणि आळंदीहून ज्ञानोबांची पालखी पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीसाठी जाते. त्याबरोबर ”माऊली माऊली”, ”ज्ञानोबा माऊली तुकाराम”, ”विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल’ असा हरिनामाचा गजर करीत लाखो वारकरीदेखील आळंदीहून पंढरपूरला पायी जातात. आषाढी वारी हा संपूर्ण महाराष्ट्राचा उत्सव असून या काळात सर्वत्र उत्साह आणि चैतन्याचे वातावरण असते. यावेळी संताच्या पालख्यांचे पंढरपूरकडे प्रस्थानाचे होते. यंदा जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानाकडून जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, तुकोबांची पालखी १८ जून २०२५ रोजी देहू येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. श्री ज्ञानेश्वरमहाराज संस्थान कमिटीकडून जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आळंदी येथून जेष्ठ कृष्ण अष्टमी म्हणजेच १९ जून २०२५ रोजी ज्ञानोबांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे.

यंदा भाविकांना विठुरायाच्या दर्शनसाठी तासन् तास रांगे उभे राहावे लागू नये यासाठी टोकण प्रणालीची सुविधा सुरु केली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी याबाबत माहिती देताना स्पष्ट केली,”प्रायोगिक तत्त्वावर टोकन दर्शन प्रणाली चाचणीचा शुभारंभ करण्यात आला आहे. सुरुवातीला २६ जूनपर्यंत ही सुविधा उपलब्ध असणार आहे. यामधील काही त्रुटी आणि बदल करून पुढे ही सुविधा सुरू करणार आहे. समितीच्या संकेतस्थळावरून ही सुविधा सुरू असून भाविकांसाठी ऑफलाइन म्हणजेच दर्शनरांगेच्या माध्यमातून देखील दर्शन घेता येणार आहे. रोज १ हजार २०० भाविकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. सकाळी १० ते रात्री ८ या कालावधीत देवाची पुजा-आरती वगळून प्रत्येक तासाला २०० भाविकांना दर्शन घेता येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विठुरायाच्या दर्शनासाठी टोकन दर्शन कसे बुक करावे?

स्टेप १ : बुकिंग करण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावरून भेट द्या.
स्टेप २: त्यानंतर Online Darshan Pass Booking या पर्यायावर क्लिक करा. तिथे तुम्हाला फॉर्म कसा भरावा याची माहिती थोडक्यात दिली आहे. त्यानंतर ‘लॉग ईन’ पर्यायावर क्लिक करा.
स्टेप ३ : लॉगिन पेजवर मोबाइल नंबर टाका.
स्टेप ४ : तुमच्या दिलेल्या नंबरवर पाठवला OTP जाईल, तो OTP टाका आणि ‘लॉगिन’ बटणावर क्लिक करा
स्टेप ५ : OTP व्हेरिफिकेशननंतर पोर्टलमध्ये लॉगिन करा.
स्टेप ६ : तुम्हाला ज्या तारखेला भेट द्यायची आहे ती तारीख निवडा, किती वाजता दर्शन घ्यायचे आहे ती वेळ निवडा आणि आवश्यक माहिती भरा आणि त्याची प्रिंट काढून स्वत: जवळ ठेवा.
स्टेप ७: दर्शनाच्या दिवशी, मंदिराच्या शेजारील नामदेव पायरीजवळील श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथून या टोकनची पडताळणी करून घ्या.
स्टेप ८: त्यानंतर दर्शन हॉलमध्ये प्रवेश मिळेल आणि ठरलेल्या वेळेनुसार थेट दर्शन रांगेतून जाऊन विठ्ठू माऊलीचे दर्शन घेता येईल.