सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित अनेक छान छान व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्राणीप्रेमी हे व्हिडीओ आवडीने बघतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या व्हिडीओमधील माकडाच्या करामती बघून तुम्हाला नक्कीच हसू येईल. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला विश्वास बसेल की माकड हेच आपले खरे पूर्वज आहेत. कारण त्यांच्या हालचाली या माणसांसारख्याच वाटतात.

माकड हे आपल्या खोडकर आणि उपद्रवी स्वभावामुळे ओळखले जातात. पण या व्हिडीओमधील माकड तसा नाही आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगा बॅकफ्लिप मारताना दिसतोय. त्याची नक्कल करताना समोर असलेला माकडसुद्धा गोलांटी मारतोय. विशेष म्हणजे मुलाने एक गोलांटी मारली तर माकडाने चक्क दोन गोलांट्या मारल्या. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना फारच आवडला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल. फक्त ९ सेकंदाच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Viral Video : ‘हे आता अतिच होतंय…’ गुलाबजाम चाटचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना राग अनावर

Photos : चीनमध्ये करोनाने पुन्हा डोकं वर काढलं; ‘या’ तीन शहरामध्ये कडक लॉकडाउन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ Fred Schultz या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. याच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, तुम्ही यांच्यासारखे करू शकता का? दोन दिवसांपूर्वी अपलोड झालेला हा व्हिडीओ आतापर्यंत १ लाख २४ हजार पेक्षाही जास्तवेळा बघितला गेला आहे. तर, या व्हिडीओला ९ हजारपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने कमेंट करताना लिहिले आहे की, ‘मला समजत नाही की कोण कोणाला ट्रेनिंग देत आहे.’ एकूणच, हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला आहे आणि ते खूप एन्जॉय करत आहेत.