सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात काही व्हिडीओ असे असतात जे पाहून स्वत:च्या डोळ्यांवर आपला विश्वास बसत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही देखील अवाक् व्हाल. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला चक्क मगरीच्या पिल्लाला पीठाच्या गोणीप्रमाणे पाठीवर घेऊन आरामात रस्त्यावर फिरत होता.
मगरींना भयंकर आणि धोकादायक मानले जाते, ती कोणावरही कधीही जीवघेणा हल्ला करु शकते, मगर बघितली तरी अनेकांना घाम फुटतो. त्यामुळे मगरींपासून अनेकजण १० हात लांबच राहतात. कारण मगर हा असा प्राणी आहे जो क्षणार्धात आपल्या भक्ष्याला फाडून गिळंकृत करू शकतो. पण व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक चिमुकला मगरीला पाठीवर घेऊन आरामात फिरतोय. हे दृश्य अंगावर काटा आणणारे आहेत.
व्हिडिओमध्ये चिमुकल्याने मगरीचे पुढचे दोन पाय आपल्या हातांनी पकडून खांद्यावर ठेवले आणि अगदी आरामात घेऊन जाताना दिसत आहे, यावेळी मगरीचे मागचे दोन पाय आणि शेपटी खाली लटकलेली दिसत आहे. या धाडसीमुळेचे कृत्य अनेकांनाच आश्चर्यचकित करणारे आहे.
हा व्हिडिओ ट्विटरवर @FunnyVideosID या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आत्तापर्यंत खूप वेळा पाहिला गेला असून मोठ्याप्रमाणात शेअर केला जात आहे. अवघ्या ८ सेकंदांचा हा व्हिडिओ यावर्षी १६ फेब्रुवारी रोजी शेअर करण्यात आला होता, जो आतापर्यंत ३७४.८ हजार वेळा पाहिला गेला आहे, तर १४ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. व्हिडीओ पाहणारे युजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘मगर थकली असावी म्हणून तिला मदतीची गरज होती. आणखी एका यूजरने लिहिले की, ‘मगरीला चांगला मित्र सापडला आहे.