सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. यातले काही गंभीर असतात तर काहींना पाहून आपल्याला खूप हसू येते. असाच एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर समोर आला आहे, जो पाहून तुम्हालाही पोट धरून हसायला भाग पडेल. हा मनोरंजक व्हिडीओ एका लहान मुलाचा आहे. व्हिडीओमध्ये दिसणारे मुल एकामागून एक अनेक देवदेवतांच्या नावाचा जप करत आपली भीती दूर करण्याचा प्रयत्न करू लागतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.

व्हिडीओमधला हा लहान मुलगा आकाशपाळण्यात बसण्यासाठी खूप उत्साही दिसत आहे. जरा जरा पाळणा वरच्या दिशेने जाऊ लागतो तशी, मुलाची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होते. सुरुवातीला मुक्गा मस्तीच्या मूडमध्ये असल्याचं दिसतं, पण पाळणा हलवायला लागताच मुलग घाबरतो आणि देवाचे नामस्मरण करू लागतो.

(हे ही वाचा: शिकार करण्यासाठी चित्त्याने घेतली हरणावर झेप पण…; बघा Viral Video)

(हे ही वाचा: Pune Metro: पुणेरी आजोबांनंतर आता मेट्रोमधील आईचा मजेशीर Video Viral)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलाचा हा व्हिडीओ एखाद्या फिल्मी सीनपेक्षा कमी वाटत नाही. पण खरतर भीती ही गोष्टच मोठी आहे. यामुळे भल्याभल्यांचा घाम फूटतो. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून यूजर्स उत्स्फूर्तपणे आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.