BPSC Teacher Exam:  देशातील वाढत्या बेरोजगारीची सर्वाधिक चिंता आजच्या तरुणांना आहे. तरुणांचा असा विश्वास आहे की, आज शिक्षणानंतर नोकरी शोधणे ही त्यांच्यासमोरील सर्वात मोठी समस्या आहे. पूर्वीच्या तुलनेत आज नोकरी मिळणे खूप कठीण झाले आहे. कमी नोकऱ्या निर्माण होत आहेत. बेरोजगारी ही देशापुढील सर्वात मोठी समस्या आहे. याच बेरोजगारीचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. बिहारमध्ये शिक्षकांच्या एक लाख ७० हजार ४६१ जागांसाठी आजपासून परीक्षा सुरू झाली आहे. आज पहिला दिवस आहे. २५ आणि २६ ऑगस्टलाही परीक्षा होणार आहे. आठ लाखांहून अधिक उमेदवार परीक्षा देणार असून बाहेरूनही उमेदवार परिक्षेसाठी आले आहेत. अशा परिस्थितीत परीक्षेच्या एक दिवस अगोदर पाटण्यात पोहोचलेल्या उमेदवारांचे हाल सुरु आहेत. कुणाला हॉटेलमध्ये रूम मिळाली नाही, तर कुणी रेल्वे स्टेशनवर रात्र काढली.

हा व्हिडीओ बिहारमधील आहे. ‘बिहार पब्लिक सर्विस कमीशन’ (BPSC) अंतर्गत शिक्षक पदांसाठी भरती जाहिर करण्यात होती. ही नोकरी मिळवण्यासाठी लाखोंच्या संख्येनं गर्दी उसळली होती. बिहारसोबतच देशातील अन्य राज्यांमधील विद्यार्थी सुद्धा BPSC परिक्षा देण्यासाठी आले होते. परिणामी पटना जंक्शनवर इतकी गर्दी उसळली की जी पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. माणसं जणू मुंग्यांसारखी भासत होती. हा व्हिडीओ पाहून लक्षात येतंय की बेजगारी किती वाढली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: फाडफाड इंग्रजी बोलणारे प्रोफेसर विकतायत मोमोज, अवघ्या २ तासात सगळे मोमोज होतात फस्त

राजधानी पाटणाच नव्हे, तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही हीच स्थिती दिसून आली आहे. भागलपूर, मुझफ्फरपूर, पूर्णियासह अनेक जिल्ह्यांमध्ये उमेदवारांना हॉटेल किंवा गेस्ट हाऊस मिळण्यातही अडचणी आल्या. जो ट्रेनने आला तो स्टेशनवरच राहिला आणि जो बसने आला त्याने बस स्टँडवरच रात्र काढली. या परीक्षेसाठी राज्यात सुमारे ८५० केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. लाखो उमेदवार परीक्षा देणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावरून गर्दीचा अंदाज घ्या की स्टेशन आणि बसस्थानक पाहिल्यावर जत्रेची गर्दी आहे असे वाटते. गाड्या, बसेस सर्व भरल्या आहेत. हॉटेल किंवा गेस्ट हाऊसमध्ये काही खोल्या रिकाम्या असताना उमेदवारांकडून राहण्यासाठी जास्त दर मागितले जात होते. अशा स्थितीत अनेक उमेदवारांनी स्थानक आणि बसस्थानकावर थांबणे पसंत केले.