Bride and Groom dance video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा अजिबात नेम नाही. सध्या सोशल मीडियावर लग्नामधील व्हिडीओ चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे नेटकऱ्यांना देखील लग्नामधील व्हिडीओ बघायला प्रचंड आवडते. लग्नामधील व्हिडीओमध्ये नवरदेव आणि नवरीच्या व्हिडिओंना खूप पसंती दिली जाते. सध्या अशाच प्रकारचा लग्नातील नवरदेव आणि नवरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ सर्वांना आवडत असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धूमाकुळ घालताना दिसतो आहे.

लग्न हे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतो. प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आपल्या लग्नाचे स्वप्न पाहतात. आपला भावी जोडीदार कसा असेल याची कल्पना करतात आणि जेव्हा हे स्वप्न सत्यात उतरते तेव्हा त्यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी कोणतीही असू शकत नाही. अरेंज असो की लव्ह, लग्न करताना प्रत्येक मुलगा किंवा मुलीची एवढीच इच्छा असते की त्यांना मनासारखा जोडीदार मिळाला पाहिजे. जेव्हा मनासारखा जोडीदार मिळतो तेव्हा लग्नातील प्रत्येक क्षण नवरा- नवरी दोघांसाठी आनंदी आणि आणखीच खास होतो. अशाच एका नवरीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे जिला मनासारखा जोडीदार आणि मनालारखं मिळल्याचा आनंद झाला आहे.यावेळी तिनं भन्नाट डान्स केलाय.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरा नवरीचा लग्नानंतरचा गोंधळाचा कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमात नवरी खांद्यावर पदर घेत नाचताना दिसत आहे. यावेळी नवरदेवही नवरीसोबत नाचताना दिसत आहे. संभळच्या तालावर नवरीनं ठेका धरत पारंपारिक डान्स केला आहे. यावेळी नवरीनं संस्कृती जपत डान्स केल्यानं तिचं आता सर्वत्र कौतुक होतंय.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर gavran_tadka1122 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “नवरदेवानं नशीब काढलं” तर दुसऱ्या एकानं प्रतिक्रिया दिली आहे की, “संस्कृती जपूनही आनंद घेता येतो याचं उत्तम उदारहण म्हणजे या ताईंचा डान्स” तर आणखी एकानं, “जेव्हा नवरीला मनासारखं सासर मिळतं तेव्हा ती अशी आनंदी असते ” अशी प्रतिक्रिया दिली आहे.